Doctor negligence Muzaffarnagar pudhari
राष्ट्रीय

Doctor negligence Muzaffarnagar: थकित पैसे मिळाले नाहीत म्हणून डॉक्टरनं जोडलेलं हाड पुन्हा तोडलं... थेट CMO ने दिले चौकशीचे आदेश

Anirudha Sankpal

Doctor negligence Muzaffarnagar: उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर येथील जिल्हाधिकार्यांकडे एक हतबल आई आपल्या १४ वर्षाच्या मानसिकदृष्ट्या अस्वस्थ मुलीला घेऊन न्याय मिळावा म्हणून आळी होती. या विधवा महिलेने जिल्हा आरोग्य विभागावर उपचाराच्या आडून अवैध वसूली केल्याचा आणि उपचारात निष्काळजीपणा केल्याचा गंभीर आरोप केला होता.

या विधवा महिलेने सरकारी रूग्णालयातील डॉक्टरने तिच्या मुलीच्या उपचाराचे फक्त पैसे मागितले नाही तर त्या डॉक्टरने त्या निष्पाप मुलीवर चुकीचे उपचार करून तिच्या पायाचे मोठे नुकसान केल्याचा देखील आरोप केला.

मोफत उपचाराचा आदेश धुडकावला

पीडित आई रेशमा यांच्यानुसार जवळपास दीड महिन्यापूर्वी त्यांच्या मुलीचा डाव्या पायाचे हाड मोडले होते. त्यामुळं त्याच्यावर जिल्हा रूग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. या ऑपरेशनसाठी रूग्णालयातील कर्मचाऱ्यांनी रेशमा यांच्याकडे २५ हजार रूपयांची मागणी केली होती. महिला विधवा असल्यानं तिने हे पैसे देण्यास असमर्थता दर्शवली. त्यानंतर डॉक्टरांनी तिच्या मुलीवर उपचार करण्यास नकार दिला. यानंतर पीडित महिला जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार घेऊन गेली. त्यानंतर सीएमओने या मुलीवर मोफत उपचार करण्याचे आदेश दिले. मात्र तरी देखील रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी ८ हजार रूपये घेतले. बाकीचे पैसे नंतर द्यावे लागणार असं देखील सांगितलं.

डॉक्टरांनी जबरदस्तीने गुडघा मोडला

संबंधित डॉक्टरांनी काही दिवसांनी चेकअपसाठी बोलवलं होतं. ज्यावेळी ती महिला मुलीला घेऊन आली त्यावेळी ऑपरेशन करणाऱ्या चतुर्वेदी डॉक्टरांनी मुलीचा गुडघा जबरदस्तीने वाकवला. त्यावेळी मुलगी वेदनेनं जोरात ओरडली. त्यावेळी तिचे हाड मोडल्याचा आवाज ऐकू आला. मात्र डॉक्टरांनी या दोघींना तिथून पळवून लावलं. ज्यावेळी पुन्हा एक्स रे करण्यात आला त्यावेळी हाड तुटल्याच आढळून आलं. पीडित मुलीच्या आईने तक्रार केली मात्र तिची तक्रार कोणी ऐकून घेतली नाही.

प्रकरणाची चौकशी सुरू

या गंभीर प्रकरणाबाबत मुजफ्फरनगरचे चीफ मेडिकल ओफिसर सुनील तेवतिया यांचे वक्तव्य देखील समोर आले हे. त्यांनी दुसऱ्या पक्षाचे म्हणणे ऐकून घेतल्याशिवाय या प्रकरणी कोणतेही वक्तव्य करणे घाईचे होईल असं सांगितलं. त्यांनी या प्रकरणाची गांभिऱ्याने चौकशी केली जाईळ असं सांगितलं आहे. जर तपासात रूग्णालयातील कर्मचारी किंवा डॉक्टर दोषी आढळले तर त्यांच्याविरूद्ध कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल असं आश्वासन त्यांनी दिलं आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT