Amit Shah on DMK: Pudhari
राष्ट्रीय

तामिळनाडूतून 'द्रमूक'चा सुपडासाफ करणार; अमित शहांचे स्टॅलिन यांना चॅलेंज

Amit Shah on DMK: मतदारसंघ पुनर्ररचनेत कोणताही अन्याय होणार नसल्याचे प्रतिपादन

Akshay Nirmale

पुढारी ऑनलाईन डेस्क: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तामिळनाडूतील सत्ताधारी द्रविड मुन्नेत्र कळघम (द्रमुक) पक्षावर टीका करत 2026 च्या विधानसभा निवडणुकीत तामिळनाडूतून द्रमूक चा सुपडासाफ करणार, असा इशारा शहा यांनी दिला आहे. नवी दिल्लीत एका न्यूज चॅनेलतर्फे आयोजित कार्यक्रमात बोलताना शहा यांनी हे वक्तव्य केले. (DMK to be uprooted in next TN polls says Amit Shah)

द्रमुक तमिळ विरोधी असल्याची टीका

अमित शहा म्हणाले की, तामिळनाडू एकेकाळी अत्यंत प्रगत राज्य होते, परंतु DMK सरकारच्या धोरणांमुळे ते अराजकतेच्या गर्तेत सापडले आहे. त्यामुळे लोक नाराज झाले असून, ते पुढील विधानसभा निवडणुकीत या सरकारला सत्तेवरून हटवण्यास तयार आहेत.

मुख्यमंत्री स्टॅलिन यांचा सत्ताधारी DMK हा तमिळविरोधी आहे. तामिळनाडू सरकारने अद्याप तामिळ भाषेत वैद्यकीय व अभियांत्रिकी शिक्षण सुरू केलेले नाही. तमिळ भाषेत पुस्तकेदेखील भाषांतरित केलेली नाहीत.

2026 मध्ये तामिळनाडूत एनडीए सरकार येईल

शहा म्हणाले, 2026 च्या विधानसभा निवडणुकीनंतर दक्षिणेकडील या राज्यात NDA सरकार स्थापन होईल. तामिळनाडूमधील DMK सरकार केवळ भ्रष्टाचारातच गुंतले आहे, त्यामुळे उद्योग व तरुण मोठ्या प्रमाणात राज्याबाहेर स्थलांतर करत आहेत. तामिळनाडू हे एकेकाळी दक्षिण भारतातील सर्वात प्रगत राज्य मानले जात होते.

ते आता DMK सरकारच्या धोरणांमुळे अराजकतेच्या गर्तेत सापडले आहे. त्यामुळे जनता द्रमुक सरकारबाबत असंतुष्ट आहे. आगामी निवडणुकीत तामिळनाडूमध्ये निश्चित्तच NDA सरकार स्थापन होईल. अलीकडच्या काळात तामिळनाडूला भेट दिली तेव्हा तेथील जनतेच्या मनात काय चालले आहे याचा अंदाज आला.

मतदारसंघ पुनर्रचनेत अन्याय होणार नाही

दरम्यान, लोकसभा मतदारसंघांच्या पुनर्रचनेबाबत विचारले असता ते म्हणाले की, हा मुद्दा द्रमुक पक्षाने 2026 च्या राज्य निवडणुकीच्या दृष्टीने उपस्थित केला आहे. केंद्र सरकारने मतदारसंघ पुनर्ररचेनेबाबत काही सांगितले आहे का? मग त्यांनी आत्ताच हा मुद्दा का उपस्थित केला?

कारण निवडणुका जवळ आल्या आहेत. पाच वर्षे त्यांनी भ्रष्टाचार केला आणि आता अचानक त्यांना जाग आली. मी स्पष्टपणे सांगतो, मतदारसंघ पुनर्ररचनेत कुणावरही अन्याय होणार नाही. त्यात 0.0001 टक्केही अन्याय होण्याची शक्यता नाही.

स्टॅलिन यांना उदयनिधी यांना उत्तराधिकारी बनवायचे आहे...

शहा म्हणाले, DMK अध्यक्ष आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांना त्यांचे पुत्र व राज्याचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांना उत्तराधिकारी बनवायचे आहे. कारण हा पक्ष वंशवादी राजकारण करत आहे.

राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार (NEP) प्राथमिक शिक्षण मातृभाषेत दिले जाणे आवश्यक आहे. मी DMK ला तामिळमध्ये वैद्यकीय आणि अभियांत्रिकी शिक्षण सुरू करण्यास सांगितले. पण त्यांनी ते केले नाही. त्यांनी पुस्तकेही तामिळमध्ये भाषांतरित केलेली नाहीत.

अण्णा द्रमुकशी युतीबाबत काय म्हणाले अमित शहा?

गृहमंत्री म्हणाले की, Common University Entrance Test (CUET) हे केंद्रीय विद्यापीठांच्या पदवी अभ्यासक्रमांसाठी 13 भाषांमध्ये घेतली जाते. पण DMK च्या विरोधामुळे त्यात तमिळचा समावेश नाही. भाजप आणि AIADMK यांच्यातील संभाव्य युतीबाबत विचारले असता, शहा म्हणाले की चर्चा सुरू आहेत. योग्य वेळ आल्यावर आम्ही याबाबत घोषणा करू.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT