DMK BJP Deal Delimitation Bill: केंद्र सरकारच्या परिसीमन विधेयकाचा रस्ता साफ झाला आहे. कॅबिनेटने याला मंजुरी दिली असून आता हे विधेयक सोमवारी सभागृहात सादर केलं जाण्याची शक्यता आहे. या विधेयकाच्या बाजूने मतदान करण्यासाठी अनेक विरोधी पक्षांना देखील तयार केलं आहे. त्यात डीएमकेच्या २२ खासदारांचा मोठा रोल आहे. हे सर्व खासदार आता विधेयकाच्या बाजूने मतदान करण्याची शक्यता आहे. डीएमकेला या विधेयकाच्या बाजूने मतदान करण्यासाठी राजी करायला सरकारला जवळपास एक वर्षे चर्चा करावी लागली. या चर्चेची सर्व सूत्रे कनीमोझी यांनी आपल्या हातात घेतली होती.
या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान डीएमकेने आपल्या दोन मागण्या कायम ठेवल्या होत्या. तमिळनाडूच्या जागांच्या टक्केवारीत कोणती घट होऊ नये, अन् दुसरी म्हणजे १९७१ च्या जनगणनेचा आधार मानून पुढच्या २५ वर्षांसाठी हे डिलिमिटेशन फ्रीज करण्यात यावं.
डीएमकेने या दोन मागण्या मान्य झाल्यावर शनिवारी आपल्या २२ लोकसभा सदस्यांना आि ८ राज्यसभा सदस्यांची एक बैठक बोलावली. डीएमके संसदीय दलाच्या नेत्या कनिमोझी राजाथी करूणानिधी या २०२६ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वीपासूनच भाजपसोबत चर्चा करत होत्या. चर्चेची सूत्रे त्यांच्याच हातात होती.
टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार एप्रिलमध्ये ज्यावेळी हे विधेयक पहिल्यांदा सादर केलं गेलं त्यावेळी बीजेपीने डीएमकेशी पहिल्यांदा संपर्क केला होता.
डीएमकेच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितलं की, 'त्यावेळी डीएमकेमुळं हे बील पास होऊ शकलं नव्हतं. सध्याच्या घडीला बीलच्या बाजूने जी काही अरेंजमेंट झाली आहे त्यात देखील डीएमकेचा वाटाच मोठा आहे. आता बीजेपीने संपर्क केल्यावर पक्षाने त्यांच्यासमोर दोन मागण्या ठेवल्या होत्या. नवीन बील ही एक योग्य तडजोड आहे. डीएमके आणि तामिळनाडू दोघांच्या फायद्याची ही तडजोड असेल.'
भाजपचा तर्क होता की जर हे बील पास झालं नाही तर जनगणनेची नवी प्रक्रिया सुरू होईल. पुढच्या वर्षी त्याबाबतचे घटनात्मक तरतुदी लागू हो जातील. अनेक महिने डीएमकेने या विधेयकाला विरोध केला होता. तमिळनाडूच्या १० जागा कमी होऊ शकतात अशी त्यांची मुख्य भीती होती. एप्रिल महिन्यात स्टॅलीन यांनी परिसीमन विधेयकाचा मसुदा जाळला होता. त्यावेळी त्यांनी हा काळा कायदा असल्याचं म्हटलं होतं.
पक्षाने जर २०२७ च्या जनगणनेनुसार लोकसभेच्या जागांचे पुनर्वितरण केला जातं तर तमिळनाडू सारख्या राज्यांचे नुकासन होऊ शकते. या राज्यांनी जनगणना वाढीचा दर यशस्वीरित्या अटोक्यात ठेवला आहे. त्यावेळी त्यांनी लोकसभेच्या जागेतील तमिळनाडूची सध्याची ७.१८ टक्के भागीदारी कमी होऊ शकते. १९७१ च्या जनगणनेच्या आधारावर लोकसभांच्या जागा स्थीर (फ्रीज) करण्याची व्यवस्था २५ वर्षे अजून वाढवण्याची मागणी केली होती.
स्टॅलिन यांनी मार्च २०२५ मध्ये मुख्यमंत्र्यांची बैठक बोलवून या मुद्द्यावर एक राजकीय सहमती तयार करण्याचा प्रयत्न केला होता. बैठकीत एक प्रस्ताव पास करण्यात आला होता. त्याज निष्पक्ष परिसीमन करण्याची मागणी करण्यात आली होती. डीएमकेने आधी या विधेयकाला विरोध केला म्हणूनच भाजपला काही सुरक्षा उपाय द्यावे लागले. त्यामुळेच पक्ष विरोधाचे राजकारण आता फायद्यात बदलण्यात यशस्वी झाला.
पक्षाचे काही सहयोगी पक्ष हे आधीच टीव्हीकेसोबत गेले आहेत. डीएमकेने इंडिया आघाडी सोडली आहे. त्यामुळे आता काँग्रेस आणि सहयोगी पक्षांच्या टीकेचा धोका वाढला आहे. फक्त काँग्रेस चिंतेत आहे म्हणून आम्ही तमिळनाडूच्या हिताच्या विरूद्ध जाऊ शकत नाही. आधी विरोध केला नसता तर आम्हीला नवा प्रस्ताव मिळाला नसता. यात दोन नव्या मागण्या सामील करण्यात आल्या आहेत. आता काही गमवावं लागणार नाही तर उलट भविष्यात फायदाच होईल.