Diya Binu Kerala Gen Z India youngest municipal chairperson  file photo
राष्ट्रीय

Diya Binu: केरळची पहिली 'Gen Z' आणि भारतातील सर्वात तरुण नगरपालिका अध्यक्ष; कोण आहे दिया बिनू!

Diya Binu Kerala Gen Z leader: केरळमधील एका नगरपालिकेने २१ वर्षीय तरुणीची नगराध्यक्षा म्हणून निवड करून नवा इतिहास रचला आहे.

मोहन कारंडे

Diya Binu Kerala Gen Z India youngest municipal chairperson

केरळ : केरळमधील एका नगरपालिकेने २१ वर्षीय तरुणीची नगराध्यक्षा म्हणून निवड करून नवा इतिहास रचला आहे. दिया बिनू पुल्लिककांडम यांची कोट्टायम जिल्ह्यातील पाला नगरपालिकेच्या अध्यक्षपदी निवड झाली असून, त्या देशातील सर्वात तरुण नगरपालिका अध्यक्षा ठरल्या आहेत.

केरळच्या पहिल्या 'Gen Z' नगराध्यक्षा

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने गेल्या काही आठवड्यांपासून निर्माण झालेली राजकीय अनिश्चितता आता संपुष्टात आली आहे. केरळच्या पहिल्या 'Gen Z' नगराध्यक्षा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिया यांनी पाला नगरपालिकेच्या १५ व्या प्रभागातून अपक्ष उमेदवार म्हणून १३१ मतांनी विजय मिळवला. विशेष म्हणजे, त्यांचे वडील बिनू पुल्लिककांडम आणि काका बिजू पुल्लिककांडम हे देखील अपक्ष म्हणून निवडून आले आहेत. यामुळे प्रभावशाली पुल्लिककांडम कुटुंब सत्तास्थापनेत निर्णायक भूमिकेत आले.

माध्यमांशी बोलताना दिया यांनी सांगितले की, "नगरपालिकेचा मूलभूत विकास आणि दीर्घकालीन नियोजन ही माझी प्राथमिकता असेल."

मद्रास ख्रिश्चन कॉलेजमधून अर्थशास्त्रात पदवी घेतलेल्या दिया म्हणाल्या, "माझे वडील सलग पाचव्यांदा निवडून आले आहेत. जेव्हा मी एक वर्षाची होते, तेव्हा ते पहिल्यांदा नगरसेवक झाले. त्यांचे काम पाहतच मी मोठी झाले आणि त्यातूनच मला प्रेरणा मिळाली." राजकारणात नवख्या असलेल्या दिया यांनी नगराध्यक्षाची जबाबदारी सांभाळत असतानाच आपले उच्च शिक्षणही सुरू ठेवण्याचा मानस व्यक्त केला आहे.

दिया बिनू यांनी कसा घडवला इतिहास?

निवडणुकीच्या निकालानंतर २६ सदस्यांच्या नगरपालिकेत कोणत्याही एका आघाडीला स्पष्ट बहुमत मिळाले नव्हते. अशा परिस्थितीत अपक्ष उमेदवार 'किंगमेकर' ठरले. सत्ताधारी एलडीएफ (LDF) ला १२ जागा मिळाल्या. तर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूडीएफ (UDF) ला १० जागा मिळाल्या. चार जागा अपक्षांनी जिंकल्या. यात ३ पुल्लिककांडम कुटुंबातील आणि १ काँग्रेस बंडखोर माया राहुल. पुल्लिककांडम कुटुंबाने काँग्रेसला पाठिंबा दिला, ज्यामुळे अखेर यूडीएफची सत्ता स्थापन झाली. माया राहुल यांनीही यूडीएफला पाठिंबा दिला असून त्यांची उपनगराध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

एलडीएफ नेतृत्वाने पुल्लिककांडम कुटुंबाला आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न केला, परंतु अध्यक्षपदाच्या मुद्द्यावरून ही बोलणी फिस्कटली. परिणामी, १९८५ मध्ये पाला नगरपालिकेच्या स्थापनेनंतर प्रथमच एलडीएफचा मित्रपक्ष असलेला 'केरळ काँग्रेस (M)' विरोधी पक्षात बसणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT