Dhanush Entry In Politics pudhari
राष्ट्रीय

Dhanush Entry In Politics: गर्दी फक्त चित्रपटाच्या... विजयनंतर आता अजून एक तमिळ अभिनेता राजकारणात येणार; धनुष काय म्हणाला?

Anirudha Sankpal

Dhanush Entry In Politics: थलपती विजयने टीव्हीके पक्षाच्या मार्फत तमिळनाडूच्या राजकारणात प्रवेश करत थेट मुख्यमंत्रीपदापर्यंत झेप घेतली. त्यानंतर आता अजून एक तमिळ अभिनेता राजकारणात येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. रविवारी आपल्या फॅन क्लबद्वारे आयोजित एका भव्य रक्तदान शिबिरात धनुषने भा,ण केलं. त्यावेळी त्याने पुन्हा एकदा तो राजकारणाच्या सारीपाटावर आपल्या सोंगट्या टाकण्याची शक्यता असल्याचे संकेत दिलं.

धनुषने चाहत्यांना उद्येशून गर्दी फक्त चित्रपटाच्या सेलिब्रेशनसाठी झाला नाही पाहिजे. या गर्दीचा वापर हा समाज सेवेसाठी देखील केला गेला पाहिजे असं वक्तव्य केलं. धनुषने यापूर्वी देखील तो राजकारणात येणार असल्याचे संकेत दिले होते. आता सोशल मीडियावर धनुषचे भाषण व्हायरल होत असून हा व्हिडिओ पाहून चाहते तमिळनाडूचे मुख्यमंत्र विजय यांच्यासारखे धनुष देखील लवकरच आपल्या राजकीय पक्षाची घोषणा करू शकतो असा अंदाज वर्तवत आहेत.

धुनष नेमकं काय म्हणाला?

इंडिया टुडेच्या एका रिपोर्टनुसार या कार्यक्रमात धनुषने, 'एवढे सगळे लोक एका जागी जमा झाले आहेत. अशा प्रकारच्या एकजुटीमध्ये मोठी ताकद असते. या एकजुटीचा एक उद्येश असला पाहिजे. फक्त ऑडिओ लाँच आणि मीटअपपेक्षाही पुढचा विचार केला पाहिजे. जास्तीजास्त कल्याणकारी गोष्टीत सामील होणे गरजेचे आहे. आपल्या भागातील लोक, आसपास राहणाऱ्या कुटुंबांची गरज समजून घेऊन त्यांना संभाव्य मदत करा. मला तुमच्यावर गर्व असेल मला विश्वास आहे की तुम्ही असे नक्की कराल.'

सोशल मीडियावर फॅन्स खुश

धनुषच्या या वक्तव्यावनंतर सोशल मीडियावर धनुष ट्रेंड करू लागला होता. युजर्सने थलपती विजयच्या रस्त्यावर धनुष देखील चालणार. आपल्या फॅन क्लबला एक सामाजिक संघटना आणि त्यानंतर राजकीय पक्षामध्ये बदलण्याची तयारी करत आहे असं लिहिलं.

तर दुसऱ्या एका युजरने राजकारणात स्वागत आहे धनुष, तमिळनाडूला सुशिक्षित आणि अनुशासित चेहऱ्याची गरज आहे. अस त्याला असं लिहून शुभेच्छा दिल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT