नवी दिल्ली : ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात विविध प्रकाशन संस्थांच्या दालनासह अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे दालन आहे. कुठल्याही साहित्य संमेलनात अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे दालन असण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे ग्रंथनगरीतील हे दालन आकर्षणाचे केंद्र आहे. यामध्ये यामध्ये डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी लिहिलेली अनेक पुस्तके आहेत. महाराष्ट्रात असलेला जादूटोणा विरोधी कायदा देशभरात लागू व्हावा, यासाठी स्वाक्षरी मोहीम देखील या दालनातून राबवली जात आहे. (Delhi Marathi Sahitya Sammelan)
प्रश्न तुमचा, उत्तर दाभोलकरांचे, अंधश्रद्धा विनाशाय, लढे अंधश्रद्धेचे, अंधश्रद्धा प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम, तिमिरातुनी तेजाकडे, विज्ञान आणि समाज, विचार तर कराल? स्त्रिया आणि अंधश्रद्धा निर्मूलन अशी विविध पुस्तके आहेत. तसेच डॉ. नरेंद्र दाभोळकर यांची सर्व पुस्तके २० टक्के सवलतीच्या दरात उपलब्ध आहेत.
महाराष्ट्रात असलेला जादूटोणा विरोधी कायदा देशभरात लागू व्हावा, यासाठी स्वाक्षरी मोहीम राबवली जात आहे. या स्वाक्षरी मोहीमेनंतर केंद्र सरकारला तशी मागणी केली जाणार आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या दालनाला लोकांचा प्रतिसाद उत्तम आहे. एखाद्या साहित्य संमेलनात पहिल्यांदाच दालन ठेवण्यात आले आहे, या माध्यमातून चळवळीची माहिती दिली जात आहे. अशी माहिती अ. नि. स. राज्य कार्यकारिणी सल्लागार श्रीपाल ललवाणी यांनी दिली.
महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी लिहिलेल्या आणि त्यांच्या संदर्भात इतर लेखकांनी लिहिलेले पुस्तके स्त्री आधार केंद्राच्या दालनात उपलब्ध आहेत. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी लिहिलेले प्रवास एक संघर्षाचा, स्त्री-पुरुष समानता, पोलीस मार्गदर्शक, समानतेकडून विकासाकडे, महिला मंडळ मार्गदर्शक, कौटुंबिक हिंसा विरोधी कायदा अशी पुस्तके उपलब्ध आहेत.