Crime News Pudhari
राष्ट्रीय

SHOCKING NEWS | दिल्ली हादरली! IRS अधिकाऱ्याच्या मुलीची घरात घुसून निर्घृण हत्या

काही महिन्यांपूर्वीच कामावरून काढून टाकलेल्‍या जुन्या नोकरावर संशय

पुढारी वृत्तसेवा

UPSC aspirant and daughter of IRS officer brutally murdered in Delhi

नवी दिल्ली : दक्षिण दिल्लीतील उच्‍चभ्रू परिसर समजल्या जाणाऱ्या अमर कॉलनीतील कैलाश हिल्स येथे एका तरुणीची घरात गळा आवळून निर्घृण हत्या करण्यात आल्‍याचा धक्‍कादायक घटना घडली आहे. मृत तरुणी ही १९९७ च्या बॅचमधील एका वरिष्ठ आयआरएस (IRS) अधिकाऱ्याची मुलगी असल्याची माहिती समोर आली असून, या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

तरुणी घरात एकटी असताना हल्‍लेखोराचे कृत्‍य

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आज सकाळी तरुणीचे आई-वडील नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉक आणि जिमसाठी घराबाहेर गेले होते. यावेळी तरुणी घरात एकटीच होती. याच संधीचा फायदा घेत आरोपीने घरात प्रवेश केला. आई-वडील घरी परतल्यानंतर त्यांना मुलीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळला.

चार्जरच्या वायरने आवळला गळा

आरोपीने अत्यंत क्रूरपणे या तरुणीचा घातपात केला आहे. प्राथमिक तपासानुसार, मोबाईल चार्जरच्या वायरने गळा आवळून तिची हत्या करण्यात आली. घराची आणि मृतदेहाची अवस्था पाहता, हत्येपूर्वी तरुणीवर लैंगिक अत्याचार झाला असावा, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. मात्र, याला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही; पोस्टमॉर्टम अहवालानंतरच याबाबत स्पष्टता येईल.

काही महिन्यांपूर्वीच कामावरून काढून टाकलेल्‍या जुन्या नोकरावर संशय

या प्रकरणात पोलिसांनी घरामध्ये काम करणाऱ्या एका जुन्या नोकरावर संशय व्यक्त केला आहे. काही महिन्यांपूर्वीच त्याला कामावरून काढून टाकण्यात आले होते. तो सध्या बेपत्ता असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. जुन्या वादातून त्याने हे कृत्य केले असावे, असा प्राथमिक अंदाज आहे.

तपासासाठी विशेष पथके तैनात

घटनेची माहिती मिळताच दिल्ली पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परिसरातील सर्व CCTV फुटेज तपासले जात आहेत.आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत.फॉरेन्सिक टीमने घटनास्थळावरून महत्त्वाचे नमुने गोळा केले आहेत. संशयित आरोपी राजस्थानचा रहिवासी असून पोलीस सध्या त्याचा शोध घेत आहेत.

तरुणी करत होते UPSC परीक्षेची तयारी

मृत तरुणीने नुकतेच इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले होते आणि ती सध्या UPSC परीक्षेची तयारी करत होती. एका हुशार आणि उच्चशिक्षित तरुणीचा अशा प्रकारे अंत झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT