पूजा खेडकर अटकपूर्व जामीनावर १२ ऑगस्टला दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी File Photo
राष्ट्रीय

पूजा खेडकर अटकपूर्व जामीनावर १२ ऑगस्टला दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा-

पूजा खेडकरच्या अटकपूर्व जामीन प्रकरणी १२ ऑगस्टला दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. दिल्लीतील पटियाला हाऊस न्यायालयाने खेडकरला जामीन देण्यास नकार दिला होता. या निर्णयाविरोधात खेडकरने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायमूर्ती सुब्रमण्यम प्रसाद यांच्या खंडपीठासमोर सोमवारी या प्रकरणी सुनावणी होणार आहे.

या प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयात शुक्रवारी सुनावणी होणार होती. मात्र, सुनावणी होऊ शकली नाही. त्यामुळे १२ ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे. दरम्यान, पूजा खेडकरला युपीएससी फसवणूक प्रकरणी १ ऑगस्ट रोजी पटियाला हाऊस न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारला होता. त्यानंतर तिने या निर्णयाला आव्हान देणारी याचिका ८ ऑगस्ट रोजी दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT