Delhi CM Rekha Gupta x
राष्ट्रीय

Delhi CM Rekha Gupta: संस्कृत ही सायंटिफिक भाषा हे 'नासा'लाही मान्य! विश्वगुरु बनण्यासाठी संस्कृत हवीच; दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचा दावा

Delhi CM Rekha Gupta: हिंदी, मराठी, बंगाली, सिंधी, मल्याळम या भाषा संस्कृतच्या शाखा; इंग्रजी नव्हे तर संस्कृत बोलणाराच हुशार असल्याचे मत

पुढारी वृत्तसेवा

Delhi CM Rekha Gupta on Sanskrit Language

नवी दिल्ली : दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी रविवारी संस्कृत ही एक 'सायंटिफिक' भाषा असल्याचा दावा करत NASA च्या वैज्ञानिकांनीही ते मान्य केल्याचे म्हटले. दिल्लीमध्ये झालेल्या 10 दिवसांच्या संस्कृत शिक्षण उपक्रमाच्या समारोप कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

दरम्यान, या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि दिल्लीचे मंत्री कपिल मिश्रा देखील उपस्थित होते.

मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांचा हा दावा बहुधा 1985 मध्ये 'AI Magazine' मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका शोधनिबंधावर आधारित आहे, ज्याचा कालांतराने अतिरंजित गौरव झाला पण त्याचा फारसा शास्त्रीय पाठपुरावा झाला नाही.

काय म्हणाल्या रेखा गुप्ता ?

रेखा गुप्ता म्हणाल्या, “NASA च्या वैज्ञानिकांनी संस्कृत भाषेवर लेख लिहिले आहेत आणि मान्य केले आहे की ही एक वैज्ञानिक भाषा आहे. कोडिंग देखील संस्कृतमध्ये करता येते. संस्कृत ही संगणकस्नेही भाषा आहे."

रेखा गुप्ता यांनी भाषेच्या सामाजिक प्रतिष्ठेवर भाष्य करत म्हटले आहे की, "जर आपल्या मुलांना फ्रेंच, जर्मन किंवा इंग्रजी चांगली बोलता येत असेल तर आपण त्या मुलाला हुशार मानतो आणि अभिमानाने सांगतो.

पण जर एखादा मुलगा किंवा मुलगी तितक्याच सहजतेने संस्कृत बोलत असेल, तर त्याला महत्त्व दिलं जात नाही."

हिंदी, मराठी, मल्याळम या संस्कृतच्या शाखा

त्यांनी असंही म्हटलं की, संस्कृत ही भारतीय संस्कृतीची आधारभूत भाषा आहे आणि भारतातील अनेक भाषांशी ती निगडित आहे.

प्रत्येक राज्याची आपली मातृभाषा असते, पण खऱ्या अर्थाने संस्कृत ही आपल्या सर्वांची मूळ मातृभाषा आहे. कारण हिंदी, मराठी, बंगाली, सिंधी, मल्याळम या सगळ्या भाषा संस्कृतच्या शाखा आहेत."

1985 चा लेख आणि NASA चा संदर्भ

'Knowledge Representation in Sanskrit and Artificial Intelligence' या नावाने प्रसिद्ध झालेला लेख Rick Briggs नावाच्या NASA Ames Research Centre मधील संशोधकाने लिहिला होता.

त्यांनी यात संस्कृतसारखी नैसर्गिक भाषा कृत्रिम बुद्धिमत्तेच्या कामासाठी उपयोगी ठरू शकते, हे मांडण्याचा प्रयत्न केला होता.

Briggs यांनी प्राचीन संस्कृत व्याकरणकारांचा संदर्भ देत म्हटले होते की, त्यांनी अशा प्रकारे संस्कृतची पुनर्मांडणी केली आहे जी आजच्या कृत्रिम बुद्धिमत्तेतील (AI) पद्धतींशी स्वरूपात आणि तत्त्वतः पुर्णतः जुळते. यापलीकडे Briggs यांच्याविषयी अधिक माहिती उपलब्ध नाही.

'विश्वगुरु' बनायचं असेल तर संस्कृतचे ज्ञान आवश्यक

रेखा गुप्ता यांनी भाजपच्या 'विश्वगुरु भारत' संकल्पनेला जोड देत सांगितले, "आपण जर ‘विश्वगुरु’ बनायचं असेल, तर अधिकाधिक ज्ञान संस्कृतच्या माध्यमातून मिळवायला हवं. दिल्ली सरकार सरकारी शाळांमधून संस्कृत अधिक सहजसोप्या पद्धतीने शिकवण्यासाठी प्रयत्न करेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT