दिल्लीच्या मुख्यमंत्री अतिशी यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट  Pudhari Photo
राष्ट्रीय

दिल्लीच्या मुख्यमंत्री अतिशी यांनी घेतली पंतप्रधान मोदींची शिष्टाचार भेट

एक्सवर पोस्ट करत दिली माहिती

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा-

दिल्लीच्या मुख्यमंत्री अतिशी मार्लेना यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शिष्टाचार भेट घेतली. अतिशी यांनी मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधानांची भेट घेतली. दिल्लीच्या कल्याणासाठी, प्रगतीसाठी केंद्र आणि दिल्ली सरकार यांच्यात पूर्ण सहकार्याची अपेक्षा व्यक्त करते, अशी प्रतिक्रिया अतिशी यांनी भेटीनंतर ‘एक्स’वर पोस्ट करुन दिली. फेब्रुवारी २०२५ मध्ये दिल्ली विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यासाठी निवडणुकीच्या तयारीला भाजप आणि आम आदमी पक्षाने सुरुवात केली आहे. भाजपकडून दिल्ली सरकारवर आरोप केले जात आहेत. तर ‘आप’कडून केंद्र सरकावर दिल्ली सरकारला सहकार्य न करण्याचे आरोप केले जातात. अशामध्ये केंद्र सरकारने दिल्लीच्या विकासासाठी सहकार्य करावे, यासाठी मुख्यमंत्री अतिशी यांनी ही भेट घेतली.

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्ली मद्य धोरण गैरव्यवहार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. त्यानंतर त्यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे अतिशी यांच्याकडे दिल्लीचे नेतृत्व आले. दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांनी २१ सप्टेंबर रोजी अतिशी यांना मुख्यमंत्री पदाची शपथ दिली होती.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT