राष्ट्रीय

Delhi car blast case : दिल्ली कार स्फोट प्रकरणाचा तपास 'एनआयए'कडे

स्फोटातील मृतांची संख्या १२ वर, केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी घेतली उच्‍चस्‍तरीय बैठक

पुढारी वृत्तसेवा

Delhi car blast case : केंद्रीय गृह मंत्रालयाने आज (दि. ११) दिल्ली कार स्फोट प्रकरण राष्ट्रीय तपास संस्थेकडे (एनआयए) सोपवले. सोमवारी संध्याकाळी मध्य दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ हुंडई आय२० कारमध्ये स्‍फोट झाला होता.

दिल्ली स्फोटातील मृतांची संख्या १२ वर

दिल्ली स्फोटातील मृतांची संख्या १२ वर पोहोचली आहे. यामध्ये दोन महिलांचा समावेश आहे. वीस जखमींवर उपचार सुरू आहेत. दोन मृतदेहांची ओळख पटली आहे. उर्वरितांची ओळख डीएनए चाचणीद्वारे पटवली जाईल. सोमवारी संध्याकाळी ६:५२ वाजता लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक १ जवळ चालत्या कारमध्ये एक शक्तिशाली स्फोट झाला होता. या सगळ्याच्या मागे नेमकं कोण आहे हे शोधून काढणार आणि त्यांना धडा शिकवणार, असं पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी स्‍पष्‍ट केले आहे. आता मराठी अधिकारी अर्थात एनआयएचे प्रमुख सदानंद दाते यांच्‍या मार्गदर्शनाखाली या स्‍फोटाचा तपास होणार आहे.

अमित शहांनी घेतली उच्चस्तरीय सुरक्षा आढावा बैठक

दिल्ली पोलिसांच्या माहितीनुसार, सोमवारी संध्याकाळी ६.५२ वाजता लाल किल्ला (लाल किल्ला) मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक १ जवळील सुभाष मार्ग ट्रॅफिक सिग्नलवर हा स्फोट झाला.अनेक वाहने जळून खाक झाली. या स्‍फोटात आतापर्यंत १२ जण ठार तर २० जण जखमी झाले आहेत. दरम्‍यान, स्फोटाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उच्चस्तरीय सुरक्षा आढावा बैठक घेतली. तत्‍पूर्वी गृहमंत्र्यांनी सांगितले होते की, "सर्व शक्यतांचा शोध घेतला जात आहे आणि सर्व पर्याय विचारात घेऊन सखोल चौकशी केली जाईल."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT