दिल्लीतील बॉबस्फोट प्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) आज सोयब याला अटक केली.  
राष्ट्रीय

Delhi Blast : दहशतवादी उमरला आश्रय देणारा आरोपी NIAच्‍या जाळ्यात, कोण आहे फरिदाबादचा सोयब ?

दिल्‍ली बॉम्‍बस्‍फोट प्रकरणी राष्‍ट्रीय तपास संस्‍थेने आतापर्यंत केले ७ जणांना अटक

पुढारी वृत्तसेवा

Delhi Blast Case : दिल्‍ली बॉम्‍बस्‍फोट प्रकरणची चौकशी करत असलेल्या राष्ट्रीय तपास संस्थेला (NIA) आज(दि. २५) मोठे यश मिळाले. दहशतवाद्यांना आश्रय देणे आणि विविध सुविधा पुरवणाऱ्या एकाला अटक करण्यात आली आहे. सोयब असे त्‍याचे नाव असून, दहशतवादी उमर ऊन नबी याला हल्ल्यापूर्वी त्‍यानेच आश्रय देण्‍याबरोबरच अन्‍य सुविधा उपलब्ध करून दिल्‍या होत्‍या, अशी माहिती तपासात समोर आली आहे.

कोण आहे सोयब ?

या प्रकरणात फरार असलेल्या मदतनीस आरोपीला NIAने जेरबंद केले असून त्याची ओळख सोयब अशी झाली आहे. तो हरियाणातील फरीदाबादच्या धौज परिसराचा रहिवासी आहे. तपासाशी संबंधित सूत्रांच्या माहितीनुसार, सोयबने मुख्य आरोपी दहशतवादी उमर उन नबी याला स्फोटापूर्वी आश्रय दिला होता. तसेच त्‍याला अन्‍य सुविधाही पुरविल्‍या होत्‍या. सोयबने केलेल्‍या मदतीमुळेच दहशतवादी उमर उन नबी अडथळ्याविना आपला घातक कट राबवू शकला.NIAची टीम आता सोयबची सखोल चौकशी करत आहे, ज्यामधून या नेटवर्कमधील इतर सदस्यांविषयी तसेच स्फोटामागील संपूर्ण कटाचा उलगडा होण्याची शक्यता आहे.

दिल्‍ली बॉम्‍बस्‍फोटप्रकरणी आतापर्यंत ७ जणांना अटक

दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ 10 नोव्हेंबरला झालेल्या कार बॉम्बस्फोट प्रकरणात NIAने आतापर्यंत सात जणांना अटक केली ाहे. NIAच्या माहितीनुसार सोयबने दहशतवादी उमरच्‍या राहण्याची सोय, हालचालीसाठी मदत तसेच इतर अनेक सुविधा सुविधा पुरवल्या होत्या. यापूर्वीही तपास यंत्रणांनी या प्रकरणातील आतापर्यंत सात 7 जणांना अटक केली असून ते सर्वजण उमरचे सहकारी असल्याचे निष्पन्न झाले आहे. दरम्यान, हल्ल्यामागील संपूर्ण कटाचा उलगडा करण्यासाठी NIAकडून अद्यापही विविध राज्यांत छापेमारी सुरू असून, या आत्मघाती कार स्फोटातील संपूर्ण जाळे उघडकीस आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

दिल्‍ली बॉम्‍बस्‍फोटात १५ जणांचा मृत्‍यू

10 नोव्हेंबर 2025 रोजी लाल किल्ला मेट्रो स्थानकाजवळ कारमध्ये झालेल्या भीषण स्फोटाने राजधानीसह संपूर्ण देश हादरला. हा हल्ला ‘व्हाइट कॉलर टेरर’ नेटवर्कचा भाग असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे, ज्यात उच्चशिक्षित व्यावसायिक डॉक्टर सामील असल्याचा संशय व्यक्त होत आहे. या हल्ल्यात आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू झाला असून 20 हून अधिक लोक जखमी आहेत. प्राथमिक तपासात या हल्ल्याचे धागेदोरे परदेशाशी, विशेषतः पाकिस्तान आणि तुर्कीशी, जोडले गेले असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT