लाल किल्ल्याजवळ स्फोट झालेला I20 कार हा जम्मू-काश्मीरचा डॉक्टर उमर नबीने चालवला होता याची पुष्टी झाली आहे.  
राष्ट्रीय

Delhi Blast : दिल्ली स्फोट प्रकरणी मोठा खुलासा, डॉक्‍टर उमर नबी कार चालवत असल्‍याचे DNA चाचणीतून स्‍पष्‍ट

पुलवामा येथील कुटुंबातील सदस्यांचे डीएनए चाचणीसाठी घेण्‍यात आले होते नमुने

पुढारी वृत्तसेवा

Delhi Red Fort Blast Umar Nabi DNA test confirms : दिल्‍ली कार बॉम्‍बस्‍फोट प्रकरणी अत्‍यंत महत्त्‍वाची बातमी समोर आली आहे. लाल किल्ल्याजवळ स्फोट झालेला I20 कार हा जम्मू-काश्मीरचा डॉक्टर उमर नबीने चालवला होता याची पुष्टी झाली आहे. काश्मीरच्या पुलवामा येथील त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे डीएनए नमुने घेण्‍यात आले होते. कारमधून मिळालेल्या मानवी अवशेषांशी जुळवले गेले असून, डॉ उमर हाच कार चालवत होता स्‍पष्‍ट झाल्‍याचे वृत्त ANIने दिले आहे.

पुलवामा येथील कुटुंबातील सदस्‍यांचे घेतले होते नमुने

दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवून आणणारा व्यक्ती काश्मीरमधील वैद्यकीय व्यावसायिक डॉ उमर उन नबी असल्याचे डीएनए चाचणीतून स्पष्ट झाले आहे. हा आत्‍मघाती हल्‍ला होता. डॉ. उमर उन नबीच्‍या शरीराच्‍या चिंधड्या झाल्‍या होत्‍या. या स्‍फोटात १२ जणांच मृत्‍यू झाला होता. तपासकर्त्यांना सुरुवातीलाच संशय आला होता की बॉम्बस्फोट करणारा डॉक्टर उमर होता, ज्याने स्फोटाच्या ११ दिवस आधी हल्ल्यात वापरलेली पांढरी ह्युंदाई आय२० खरेदी केली होती. काश्मीरच्या पुलवामा येथील त्याच्या कुटुंबातील सदस्यांचे घेतलेले डीएनए नमुने नंतर कारमधून सापडलेल्या मानवी अवशेषांशी जुळवले गेले, ज्यामुळे डॉक्टर उमर हा स्फोट झाला तेव्हा हुंडई आय२० चालवत होता हे पुष्टी झाली आहे.

डॉ. उमर सीसीटीव्‍हीत कैद

पुलवामाच्या कोइल गावात डॉ. उमर याचे वर्तनात मागील काही महिन्‍यात बदल झाला होता. तो वारंवार फरिदाबाद आणि दिल्लीला प्रवास करत होता. स्फोटाच्या दिवशीच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये तो दुपारी ३ वाजता मशिदीजवळ दिसला आणि नंतर तो लाल किल्ल्याकडे गेल्‍याचे दिसते. पोलिसांनी फरिदाबादमध्ये उमरच्या नावावर नोंदणीकृत असलेली एक लाल फोर्ड इकोस्पोर्ट कार जप्त केली आहे. पासात समोर आले की डॉ. उमर नबी आणि डॉ. मुझम्मिल गनी हे तुर्कीला गेले होते. तुर्कीच्या भेटीनंतर एका हँडलरने या 'डॉक्टर मॉड्यूल'ला संपूर्ण भारतात पसरून लक्ष्य निवडण्याची सूचना दिली होती.दिवाळीदरम्यान गर्दीच्या ठिकाणी हल्ले करण्याची योजना आखली होती, पण हा कट उधळला गेला. या गटाचा २००८ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यासारखा मोठा हल्ला करण्याचा हेतू होता, असेही पोलिसांनी म्‍हटले आहे. दरम्‍यान, दिल्ली पोलिसांचे विशेष पथक, जम्मू-काश्मीर पोलिस आणि उत्तर प्रदेश एटीएससह अनेक तपास यंत्रणा हाय अलर्टवर आहेत आणि फरिदाबाद मॉड्यूलशी संबंधित इतर लोकांचा शोध घेत आहेत.

9 नोव्‍हेंबरपासून डॉ. उमर होता बेपत्ता

पोलीस तपासात स्‍पष्‍ट झाले आहे की, डॉ. उमर हा ९ नोव्‍हेंबरपासून बेपत्ता होता. यापूर्वी म्‍हणजे ८ नोव्‍हेंबर रोजी फरिदाबादमधील एकदा गोदामात सुमारे २,९०० किलो अमोनियम नायट्रेट (स्फोटक पदार्थ) सापडले होते. पोलिसांना त्याच्या कागदपत्रांवर दिल्लीचा पत्ता बनावट आढळला. दिल्‍ली बॉम्‍बस्‍फोट प्रकरणी पोलिसांनी अनेकांना अटक केली आहे. यामध्‍ये फरिदाबादमधील डॉ. शाहीन शाहिद हिचाही समावेश आहे. तिच्‍याकडे दहशवादी संघटना जैश-ए-मोहम्मद (JeM)च्‍या महिला शाखा असलेल्या 'जमात-उल-मोमिनत' च्या भारत युनिटची जबाबादारी होती. दरम्‍यान, या प्रकरणी डॉ. मुझम्मिल अहमद गनई आणि डॉ. अजमुल अहमद मलिक या इतर दोन डॉक्टरांनाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.मौलवी इरफान याला अटक झाल्यावर दक्षिण काश्मीरमध्येमौलवीने या तीन डॉक्टरांना कट्टरपंथी बनवले, असे पोलिसांच्‍या तपासात स्‍पष्‍ट झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT