राष्ट्रीय

दिल्ली : अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या सरकारी अधिकाऱ्याला अटक करा : स्वाती मालीवाल

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : दिल्ली सरकारच्या एका अधिकाऱ्यावर त्याच्या मृत मित्राच्या अल्पवयीन मुलीवर अनेक महिन्यांपासून बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र पोलिसांनी अद्याप त्याला अटक केलेली नाही. मुलींच्या रक्षणाची जबाबदारी असलेलाच भक्षक बनला तर मुली कुठे जातील, संबंधीताला लवकरात लवकर अटक करावी, अशी मागणी दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी केली आहे.

दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या प्रकरणातील आरोपी दिल्ली सरकारी अधिकाऱ्याला निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच मुख्य सचिवांकडून आज संध्याकाळी ५ वाजेपर्यंत अहवाल मागवला आहे.

दिल्ली सरकारच्या महिला आणि बाल विकास विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने मित्राच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी या वरिष्ठ अधिकार्‍याविरुद्ध POCSO कायद्यांतर्गत एफआयआर नोंदवला आहे. या प्रकरणात अधिकाऱ्याच्या पत्नीवरही अत्याचारात मदत केल्याचा आरोप आहे. पिडीत मुलगी बारावीची विद्यार्थिनी असल्याचे समजते. 2020 मध्ये तिच्या वडीलांचे निधन झाले. त्यानंतर आरोपीने तिला आपल्या घरी आणले. 2020 ते 2021 या कालावधीत त्याने तिच्यावर अनेकवेळा बलात्कार केला. पिडीत मुलगी गरोदर राहिल्यानंतर त्याने त्याच्या पत्नीला सांगितले. अधिकाऱ्याच्या पत्नीने कथितपणे त्यांच्या मुलाला औषधे आणण्यास सांगितले आणि घरीच गर्भधारणा संपुष्टात आणली, असे पिडीत अल्पवयीन मुलीने तिच्या तक्रारीत पोलिसांना सांगितले आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT