Digital Arrest Scam Pudhari
राष्ट्रीय

Delhi IGI Airport | दिल्ली विमानतळावर कोटी मोलाचे 10 अत्याधुनिक डिफेन्स ड्रोन्स जप्त

Delhi IGI Airport | तिन्ही प्रवाशांना अटक; 'कस्टम्स'कडून चौकशी

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमा शुल्क विभागाने (कस्टम्स) तस्करीचा मोठा कट उधळून लावला आहे. व्हिएतनाममार्गे हाँगकाँगहून आलेल्या तीन भारतीय प्रवाशांकडून १ कोटी ३ लाख रुपयांहून अधिक किमतीचे १० व्यावसायिक आणि संरक्षण दर्जाचे अत्याधुनिक ड्रोन्स जप्त करण्यात आले आहेत. या तिन्ही प्रवाशांना ताब्यात घेण्यात आले असून कस्टम्स विभागाकडून त्यांची कसून चौकशी सुरू आहे.

नवी दिल्लीगुप्त माहितीच्या आधारे 'टर्मिनल-३'वर सापळा

कस्टम्स अधिकाऱ्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे २५ सप्टेंबर रोजी ही कारवाई करण्यात आली. तिन्ही संशयित प्रवासी हाँगकाँगहून व्हिएतनाममार्गे दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील टर्मिनल-३ वर उतरले होते.

कस्टम्स तपासणी चुकवण्यासाठी हे प्रवासी बिनदिक्कतपणे ग्रीन चॅनेल ओलांडून बाहेर पडण्याच्या प्रयत्नात असताना दबा धरून बसलेल्या अधिकाऱ्यांनी त्यांना अडवले. नवी दिल्ली

साहित्याची झडती आणि उच्च तंत्रज्ञानाचे ड्रोन्स उघड

अधिकाऱ्यांनी प्रवाशांच्या सामानाची कसून झडती घेतली असता त्यांच्याकडे 'ऑटेल रोबोटिक्स एमडीएक्स-१' बनावटीचे १० उच्च तंत्रज्ञानयुक्त व्यावसायिक ड्रोन्स सापडले. याशिवाय, अत्याधुनिक कंट्रोलर्स, कॅमेरा माऊंटेड गिम्बल्स, केबल्स, प्रोपेलर्स आणि जॉयस्टिक्स यांचा समावेश असलेली सहायक उपकरणे हस्तगत करण्यात आली. प्रवाशांच्या सामानातून एक महागडा 'आयफोन १८ प्रो मॅक्स' देखील जप्त करण्यात आला.

SCROLL FOR NEXT