Dangerous Phone Apps: गॅस कनेक्शनच्या खोट्या अपडेट किंवा थकबादीचा बहाणा करत लोकांना लाखो रूपयांना गंडा घातला जात आहे. सायबर क्राईम करण्याच्या दिवसेंदिवस नव्या क्लुप्त्या गुन्हेगार शोधून काढत आहेत. हा प्रकार फक्त महाराष्ट्र किंवा इतर ठिकाणी नाही तर आता देशभरात पसरला आहे. यापूर्वी डिजीटल अरेस्टने देशात धुमाकूळ घातला होता. आता या गॅस कनेक्शनच्या फ्रॉडद्वारे लाखो रूपयांना गंडवलं जात आहे. नुकत्याच झालेल्या चार प्रकरणातून तब्बल ४६ लाख रूपयांचा चुना लावण्यात आला आहे. फसवणाऱ्या व्यक्ती पीडित व्यक्तीच्या फोनमध्ये एक अॅप इन्स्टॉल करण्यास सांगतात अन् त्यांच्यासोबत स्कॅम होतोय.
लखनौच्या एका पॉश भाग गोमती नगरमध्ये ६७ वर्षांच्या एका वयस्कर व्यक्तीच्या बँक खात्यात जमा असलेले ३१.८४ लाख रूपये हळूहळू गायब झाले. त्याचबरोबर ८८ वर्षाचे एका व्यक्तीच्या बँक खात्यातून ५ लाख रूपये गायब झाले आहेत. अशा प्रकारे या सायबर गुन्हेगारांच्या स्कॅमला बळी पडणाऱ्यांची यादी बरीच मोठी आहे. यात गॅस कनेक्शनचा फ्रॉड कॉल किंवा मेसेज येतो. त्याला बळी पडून लोकं लाखो रूपये गमावत आहेत. ते अॅप डाऊनलोड करण्याची एकच चूक करत आहेत.
सर्वात आधी तुम्हाला फोन येतो की तुमचे ग्रीन गॅस कनेक्शन आज बंद होणार आहे. लोकं पॅनिक करतात आणि मेसेजला रिप्लाय देतात. त्यानंतर फ्रॉड करणारा व्यक्ती त्यांना Meter Update.apk यानावाचे अॅप डाऊनलोड करा असं सांगतात. आपण घाबरून ते अॅप डाऊनलोड करतो आणि तिथंच फसतात. हे अॅप डाऊनलोड न करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
सर्वात आधी गॅस कंपनीच्या अधिकृत नंबवरच संपर्क करा. सहसा हा नंबर टोल फ्री असतो. जर फोनवरून संपर्क होत नसेल तर तुम्ही जवळच्या गॅस एजन्सीमध्ये जा.
एडीसीपी किरण यादव यांनी सांगितलं की, 'हे धोकादायक अॅप एकदा का इन्स्टॉल झालं की स्कॅम करणाऱ्यांना पीडित व्यक्तीच्या मोबाईलचा रिमोट अॅक्सेस मिळतो त्याद्वारे ते बँक खात्यांची माहिती चोरून त्यातून पैसे गायब करतात.