मोनिका क्षीरसागर
मोबाईल + जेवण = पचन बिघडण्याची शक्यता?
तज्ज्ञांच्या मते, जेवताना मोबाईल वापरल्याने लक्ष अन्नाऐवजी स्क्रीनवर जाते आणि पचन प्रक्रियेवर परिणाम होऊ शकतो.
घास नीट चावला जात नाही
स्क्रीनमध्ये गुंतल्यामुळे अन्न घाईघाईने गिळले जाते. यामुळे अपचन, गॅस आणि पोट फुगण्याचा त्रास वाढू शकतो.
जास्त खाण्याचा धोका वाढतो
मोबाईल पाहताना पोट भरल्याचा संकेत उशिरा जाणवतो. त्यामुळे नकळत जास्त कॅलरी घेतल्या जाऊ शकतात.
‘माइंडफुल ईटिंग’ का महत्त्वाची?
जेवताना अन्नाची चव, वास आणि पोत याकडे लक्ष दिल्यास पचन अधिक चांगले होण्यास मदत होते.
अॅसिडिटीटी आणि जडपणा वाढू शकतो
घाईने खाल्लेले अन्न नीट चावले जात नसल्याने अॅसिडिटी, जडपणा आणि अस्वस्थता जाणवू शकते.
जेवणासाठी किमान 20 मिनिटे द्या
हळूहळू आणि शांतपणे जेवल्यास मेंदूला पोट भरल्याचा संदेश वेळेवर मिळतो आणि अति खाणे टाळता येते.
तज्ज्ञांचा साधा सल्ला
जेवताना मोबाईल, टीव्ही किंवा इतर स्क्रीनपासून दूर राहा. हा छोटा बदल पचन आणि खाण्याच्या सवयी सुधारण्यास मदत करू शकतो.
आरोग्यदायी सवय आजपासूनच सुरू करा
जेवताना फक्त जेवणावर लक्ष केंद्रित करा, अन्न नीट चावा आणि मगच खावा. जेवणानंतर 5–10 मिनिटे हलके चालण्याची सवय लावा.