Kamla Pasand Owner’s Daughter-in-Law Dies Pudhari
राष्ट्रीय

Deepti Chaurasia: ‘कमला पसंद’ पान मसाला कंपनीच्या मालकाच्या सुनेनं संपवलं जीवन; नोटमध्ये लिहिलं, 'आता मला कोणावरही…'

Kamla Pasand Owner’s Daughter-in-Law Dies: दिल्लीतील वसंत विहारमध्ये ‘कमला पसंद’ पान मसाला कंपनीचे मालक कमल किशोर चौरसिया यांच्या सुनेने जीवन संपवलं. दीप्ती चौरसिया (40) यांचा मृतदेह घरात लटकलेल्या अवस्थेत सापडला.

Rahul Shelke

Deepti Chaurasia: दिल्लीच्या वसंत विहार परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. देशभरात ओळखल्या जाणाऱ्या ‘कमला पसंद’ आणि ‘राजश्री’ पान मसाला ग्रुपचे मालक कमल किशोर चौरसिया यांच्या सुनेनं जीवन संपवलं आहे. दीप्ती चौरसिया (40) यांचा मृतदेह मंगळवारी संध्याकाळी त्यांच्या घरात साडीला लटकलेल्या अवस्थेत सापडला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत तपास सुरू केला आहे.

दीप्तीच्या कुटुंबाचे गंभीर आरोप

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांना घटनास्थळी दीप्तीची डायरी आढळली आहे. या डायरीत तिने कोणावर थेट आरोप केले नसले तरी पतीसोबत झालेल्या भांडणाचा उल्लेख असल्याचे समजते. मात्र दीप्तीच्या माहेरच्या नातेवाईकांनी दीप्तीला सासरकडून मानसिक त्रास देण्यात आला आणि जीवन संपवण्यास प्रवृत्त करण्यात आले, असा गंभीर आरोप केला आहे. त्यांनी पोलिसांकडे लेखी तक्रार देत कठोर चौकशीची मागणी केली आहे.

2010 मध्ये झाले होते लग्न, 14 वर्षांचा मुलगा

दीप्तीचा विवाह 2010 मध्ये हरप्रीत चौरसिया यांच्यासोबत झाला होता. या दाम्पत्याला 14 वर्षांचा मुलगा आहे. माहितीप्रमाणे, हरप्रीत यांनी दोन विवाह केले आहेत आणि त्यांची दुसरी पत्नी दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री असल्याचे सांगितले जाते.

दीप्तीने नोटमध्ये लिहिले आहे “ज्या नात्यात प्रेम नाही, विश्वास नाही… त्या नात्यात राहण्याची आणि जगण्याची काय गरज?” या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून पोलिसांना पोस्टमॉर्टम अहवालाची प्रतीक्षा आहे. मृत्यूचे नेमके कारण आणि आरोपांची सत्यता काय, हे तपासानंतर स्पष्ट होणार आहे.

‘कमला पसंद’ पान मसाला ग्रुपचा मोठा व्यवसाय

कमला पसंद–राजश्री ग्रुपचा व्यवसाय देशभरात पसरलेला आहे. या समूहाची मूळ सुरुवात उत्तर प्रदेशातील कानपूर येथून झाली. संस्थापक कमला कांत चौरसिया आणि कमल किशोर चौरसिया यांनी सुमारे 40–45 वर्षांपूर्वी कानपूरच्या काहू कोठी परिसरात एका छोट्या दुकानातून पान मसाला विक्री सुरू केली होती.

आज त्याच व्यवसायाचे अब्जावधींच्या साम्राज्यात रूपांतर झाले आहे. ‘कमला पसंद’चा उत्पादन हक्क कमला कांत कंपनी LLP कडे असून देशातील अनेक महानगरांत या ब्रँडची मोठी मागणी आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT