2003 मध्ये अटलबिहारी वाजपेयी पर्वतारोहण संस्थेच्या गिर्यारोहकांनी कोसळलेल्या विमानाचा ढिगारा शोधून काढला होता. Pudhari Photo
राष्ट्रीय

हिमाचलमध्ये 56 वर्षांनंतर आढळले 4 जवानांचे मृतदेह

1968 मध्ये कोसळले होते हवाईदलाचे विमान

करण शिंदे

शिमला : हिमाचल प्रदेशातील रोहतांग खिंडीत 56 वर्षांनंतर चार भारतीय जवानांच्या मृतदेहाचे अवशेष सापडले आहेत. डोगरा स्काऊटस् (लष्कर) आणि तिरंगा पर्वतीय बचाव पथकांच्या संयुक्त मोहिमेअंती हे अवशेष बाहेर काढण्यात आले. 7 फेब्रुवारी 1968 मध्ये भारतीय हवाईदलाचे एएन-12 विमान दिब्रुगडहून लेहला जात असताना रोहतांग खिंडीत कोसळले होते. 102 सैनिक त्यात होते.

2019 पर्यंत सापडले 5 मृतदेह 2003 मध्ये या विमानाचे अवशेष सापडल्यानंतर भारतीय सैन्याने, विशेषत: डोगरा स्काऊटस्ने 2005, 2006, 2013 आणि 2019 मध्ये शोधमोहिमा राबवल्या. हा भूभाग जटिल असल्यामुळे 2019 पर्यंत फक्त पाच मृतदेह सापडले होते. सप्टेंबर 2024 मधील मोहिमेत हे 4 मृतदेह सापडले.

कुणाचे मृतदेह?

  • मलखान सिंग, कॉन्स्टेबल नारायण सिंग आणि थॉमस चरण यांचे हे मृतदेह आहेत.

  • चौथ्या मृतदेहाच्या अवशेषांची अद्याप ओळख पटलेली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT