K9 Rolo CRPF dog news  File Photo
राष्ट्रीय

नक्षलवादविरोधी मोहीम गाजवणाऱ्या 'रोलो'चा मधमाशी हल्ल्यात मृत्यू, CRPF जवानांचे डोळे पाणावले

K9 Rolo CRPF dog news | CRPFच्या जवानांनी 'गार्ड ऑफ ऑनर' सन्मान देत केले अंत्यसंस्कार

मोनिका क्षीरसागर

K9 Rolo CRPF dog news from Chhattisgarh

छत्तीसगड : केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (CRPF) 228 बटालियनमध्ये सेवा बजावत असलेल्या के9 'रोलो' हिचा मधमाशीच्या हल्ल्यात करुन अंत झाला. 27 एप्रिल 2025 रोजी तिला मृत घोषित करण्यात आले. सीआरपीएफ जवानांनी आज (दि.१६) रोलोला सन्मानार्थ गार्ड ऑफ ऑनर देत तिच्यावर अंत्यसंस्कार केले. तिला शेवटचा निरोप देताना संरक्षण दलातील जवानांचे डोळे देखील पाणावले होते.

विषारी मधमाश्यांच्या डंखांमुळे श्वानाचा मृत्यू

मधमाश्यांच्या विषारी डंखांमुळे 'रोलो'ला अ‍ॅनाफिलेक्टिक शॉक आला आणि त्यातच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. 27 एप्रिल रोजी तिला मृत घोषित आल्यानंतर आज (दि.१६) सीआरपीएफ जवानांनी रोलो फिमेल श्वानावर सन्मानपूर्वक अंत्यसंस्कार केले. सोशल मीडियावर तिच्या अंतिम निरोपाचे फोटो आणि व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

लष्करी श्वान 'रोलो' केवळ 2 वर्षांची होती

लष्करी श्वान के9 'रोलो' ही केवळ 2 वर्षांची होती आणि छत्तीसगडमध्ये नक्षलविरोधी मोहिमांमध्ये तिने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. एका विशेष ऑपरेशनमधून ड्युटी संपवून परतताना जंगलात मधमाशांनी तिच्यावर आणि एका सुरक्षा रक्षकावर हल्ला केला. या हल्ल्याचा रोलो फिमेस श्वास बळी ठरली.

ऑपरेशननंतर परतताना मधमाशांचा जवान, रोलोवर हल्ला

छत्तीसगड आणि तेलंगणाच्या सीमेजवळील करेगुट्टा हिल्स परिसरात नक्षलविरोधी विशेष ऑपरेशन सुरु होते. या ऑपरेशननंतर 'रोलो' एका जवानासोबत परतत असताना जंगलात मधमाश्यांच्या पोळ्यावर त्यांची नजर पडली. त्यानंतर मधमाशांनी जवान आणि रोलोवर एकाचवेळी हल्ला केला.

नक्षलवादविरोधी अनेक ऑपरेशन्समध्ये 'रोलो'ची भूमिका

रोलोचे हँडलर, सीआरपीएफ २२८ बीएनचे कॉन्स्टेबल शुभम गजानन म्हणतात, "श्वान फक्त २१ दिवसांचे झाल्यावर आमच्याकडे आणले जातात. त्यांची काळजी घेणे आणि त्यांना प्रशिक्षण देणे ही हँडलरची जबाबदारी आहे. श्वान आणि त्याच्या हँडलरमध्ये एक भावनिक नाते आणि संबंध असतात. प्रशिक्षणानंतर, रोलोला संघातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोत्तम श्वान म्हणूनही सन्मानित करण्यात आले होते. २२८ बीएनने केलेल्या अनेक ऑपरेशन्समध्ये, रोलोने प्रमुख भूमिका बजावली. २२ ते २५ एप्रिल दरम्यान, रोलोवर मधमाश्यांच्या थव्याने हल्ला केला जिथे सैन्य जाऊ शकत नव्हते, परंतु वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात नेताना तिचा मृत्यू झाला. जेव्हा एखाद्या श्वान योद्ध्याचा मृत्यू होतो तेव्हा असे वाटते की एखाद्या सैनिकाचा मृत्यू झाला आहे."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT