प्रातिनिधिक छायाचित्र. File Photo
राष्ट्रीय

crime news | "त्‍याने मला कानाखाली मारली, मी त्‍याला ठारच मारलं" : आरोपीचा खळबळजनक कबुली देणारा व्हिडिओ आला समोर

कॅपेमध्‍ये तरुणावर झालेल्‍या अंदाधूंद गोळीबार प्रकरणाचे गूढ उकलले

पुढारी वृत्तसेवा

Shocking crime news

नवी दिल्ली : ईशान्य दिल्लीतील मौजपूर परिसरातील एका कॅफेमध्ये २४ वर्षीय तरुणाचा गोळ्या झाडून खून करण्‍यात आल्‍याची खळबळजनक घटना शुक्रवारी (दि.२३) रात्री उडली होती. आता या प्रकरणातील संशयित आरोपीचा एक खळबळजनक कबुली देणारा व्हिडिओ समोर आला आहे. फैजान (वय २४) याची हत्या केल्याची कबुली देताना, आरोपीने अत्‍यंत थंड डोक्‍याने जुना बदला घेण्‍यासाठी कट रचल्‍याचे स्‍पष्‍ट झाले आहे.

काय घडलं होतं?

वेलकम परिसरातील रहिवासी असलेला फैजान गुरुवारी (दि. २२) रात्री मौजपूर येथील 'मिस्टर किंग लाउंज अँड कॅफे'मध्ये बसलेला असताना त्याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. गंभीर जखमी अवस्थेत त्याला गुरु तेग बहादूर (GTB) रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तिथे पोहोचण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

इन्स्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट करत दिली गुन्‍ह्याची कबुली

इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये आरोपीने दावा केला आहे की, काही महिन्यांपूर्वी फैजानने त्याला धक्‍का मारला होता. त्याचाच बदला घेण्यासाठी त्याने हे पाऊल उचलले. या हत्येमध्ये त्याच्या कुटुंबाचा किंवा मित्रांचा कोणताही सहभाग नसल्याचेही त्याने स्पष्ट केले आहे.

अन्‍य कोणाचाही संबंध नाही

व्हिडिओमध्ये आरोपी म्‍हटलं आहे की, "मी वैयक्तिक वादातून फैजानची हत्या केली. यामध्ये माझ्या वडिलांचा, कुटुंबाचा किंवा मित्रांचा कोणताही संबंध नाही. मी कोणाच्याही सांगण्यावरून किंवा पैशांसाठी हे केलेले नाही. चार महिन्यांपूर्वी त्याने मला कानशिलात लगावली होती, म्हणून मी त्याचा जीव घेतला."

पैशांच्या वादाचा दावा फेटाळला

मृत फैजानचा भाऊ सलमान याने ही हत्या पैशांच्या देवाणघेवाणीतून झाल्याचा आरोप केला होता, मात्र आरोपीने हा दावा खोटा असल्याचे म्हटले आहे. सलमानने आरोप केला होता की, फैजान कर्ज घेतले होते. ते परत करू न शकल्याने आरोपी वडिलांसह आमच्या घरी येऊन वाद घातला होता. आम्ही याबद्दल तक्रारही केली होती, पण काहीच कारवाई झाली नाही. आम्हाला त्या बाप-लेकाला अटक करण्‍यात आली पाहिजे.

आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे. घटनेनंतर, पुरावे गोळा करण्यासाठी फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोहोचली. ईशान्य दिल्लीतील वेलकम पोलिस स्टेशनमध्ये आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोळीबाराचे वृत्त मिळाल्यानंतर पोलिस अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी तपासणी केली. कॅफे आणि आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज देखील जप्त करण्यात आले आहेत. घटनेनंतर परिसरातील सुरक्षा वाढवण्यात आली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT