राष्ट्रीय

Himachal Pradesh Election Result : हिमाचल प्रदेशात सत्तांतर ; देवभूमीने काँग्रेसला तारले

अविनाश सुतार

पुढारी ऑनलाईन डेस्क : हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत (Himachal Pradesh Election Result) काँग्रेसने 35 जागा जिंकून बहुमताचा आकडा पार केला आहे. काँग्रेसच्या 5 जागा आघाडीवर आहे. तर भाजपने 18 जागा जिंकल्या असून 7 जागांवर आघाडी घेतली आहे. आज सकाळी एकूण 68 जागांच्या मतमोजणीला सुरूवात झाली. त्यानंतर काँग्रेसने सुरूवातीला घेतलेली आघाडी अखेर पर्यंत कायम ठेवली.  सत्ताधारी भाजपला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले.

हिमाचल प्रदेशात (Himachal Pradesh Election Result) गेल्या चार दशकात कोणतेही विद्यमान सरकार पुन्हा सत्तेवर आलेले नाही. काँग्रेससाठी हिमाचलमधील विजय पुनरुज्जीवनासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. दरम्यान, काँग्रेसने आपल्या विजयी आमदारांना चंदीगडला हलवण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेस नेते भूपिंदर बघेल, भूपिंदर हुड्डा आणि राजीव शुक्ला सिमल्यात दाखल झाले आहेत.

माजी मुख्यमंत्री जय राम ठाकूर यांनी मंडीतील सेराज जागेवरून 37,007 मतांच्या फरकाने विजय मिळवला आहे. ठाकूर यांना 33,256 मते (76.97%) मिळाली, तर त्यांचे जवळपास प्रतिस्पर्धी, काँग्रेसचे चेत राम यांना 8,956 मते (20.73%) मिळाली. सुंदरनगरमध्ये भाजपच्या राकेश कुमार यांनी काँग्रेसच्या सोहन लाल यांचा ८,१२५ मतांनी पराभव केला आहे. सिमला जिल्ह्यातील आठपैकी पाच मतदारसंघात काँग्रेसने विजयी आघाडी घेतली.

जयराम ठाकूर यांनी राज्यपालांकडे केला राजीनामा सुपूर्द

दरम्यान, हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी राज्यपालांकडे आपल्या पदाचा राजीनामा सुपूर्द केला आहे. मी माझा राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द केला आहे. पक्षाचा पराभव मान्य करत जनतेने दिलेल्या निकालाचा आदर आहे. जनतेच्या विकासाची कामे कधीच थांबवू देणार नाही. या पराभवाचे विश्लेषण आम्हाला करावे लागेल. निकालाची दिशा बदलणारे काही मुद्दे होते, असे जयराम ठाकूर यांनी म्हटले आहे.

काँग्रेसच्या विजयात सरकारी कर्मचाऱ्यांचा पाठिंबा आणि जुनी पेन्शन योजना पुनर्संचयित करण्याचे काँग्रेसचे आश्वासन सर्वात महत्त्वाचे ठरले. तर मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांच्याबद्दल राज्यातील शक्तिशाली अॅपल लॉबीमध्ये नाराजीची भावना होती. हा आणखी एक महत्त्वाचा घटक भाजपच्या पराभवास कारणीभूत ठरला.

हेही वाचलंत का ? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT