Congress Supreme Court March: देशाची राजधानीत आज मोठ्या राजकीय घडमोडी घडण्याची शक्यता आहे. कॉकरोच जनता पार्टीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत जंतर मंतरवर आंदोलनाची हाक दिली आहे. मात्र दिल्ली पोलिसांनी आंदोलकांना जंतर मंतरवर जाण्यापासून रोखलं.
यानंतर मुख्य विरोधी पक्ष काँग्रेसने आज (दि.१२ ऑक्टोबर) सर्वोच्च न्यायालयापर्यंत मार्च काढून सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश सूर्यकांत यांना एक निवेदन देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या मार्चला CJI सूर्यकांत मोठा झटका दिला आहे. त्यांनी विरोधी पक्ष नेते राहुल गांधी आणि राज्यसभा विरोधी पक्ष नेते मल्लिकार्जुन खरगे यांना भेटण्यास नकार दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार राज्यसभा विरोधी पक्ष नेते मल्लिकार्जुन खरगे आणि लोकसभा विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी मुख्य न्यायाधीशांना भेटण्याची वेळ मागितली होती. रविवारी रात्री उशिरा ही मागणी फेटाळण्यात आली आहे.
राहुल गांधी आणि खरगे यांनी लिहिलेल्या पत्रात सोमवारी सायंकाळी ४ ते ५ या काळात भेटीची वेळ मागितली होती. यावेळी मत चोरी रोखण्यासाठी ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा आणि एसआयआर प्रक्रिया रद्द करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती. मात्र सीजेआयने याबाबत सर्वोच्च न्यायालयात अधीपासूनच याचिका दाखल आहेत हे कारण देत भेटीची वेळ देण्यास नकार दिला होता. आता काँग्रेस आज पुन्हा एकदा भेटीची वेळ मागणार आहे.
दुसरीकडे कॉकरोच जनता पार्टीचे सह संयोजक आशुतोष रांका यांनी रविवारी सांगितलं की इतर संघटनेचे इतर नेते जंतर मंतरवर प्रदर्शन करण्यासाठी तारीख मागण्यासाठी सोमवारी दिल्ली पोलिसांशी संपर्क करणार आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरून पोस्ट करत रांका यांनी सीजेपी सह संयोजक सौरव दास, कायदेशीर टीमचे प्रमुख रत्ना सिंह तसेच इतर नेते सोमवारी सकाळी १० वाजता संसद मार्ग पोलीस ठाण्यात जाणार आहे.
त्यावेळी ते आंदोलनाची तारीख मागणार आहेत. रांका यांनी सांगितलं की दिल्ली पोलीस आम्हाला २४ तासात जंतर मंतरवर आंदोलन करण्यासाठी तारीख देऊ सकते. नाही दिली तर कॉकरोच जनता पार्टी नव्या आंदोलनाची घोषणा करणार.'