Congress Protest Outside PM House pudhari
राष्ट्रीय

Congress Protest Outside PM House: काँग्रेस उतरली मैदानात! राहुल, प्रियांका खासदारांसह गाठले पंतप्रधानांचे निवासस्थान

Anirudha Sankpal

Congress Protest Outside PM House: कॉक्रोज जनता पार्टीचे चलो संसद आंदोलन चिघळल्यानंतर दिल्लीतील राजकीय वातावरण तापलं आहे. दिल्ली पोलीसांनी आंदोलकांना थोपवण्यासाठी लाठीचार्ज आणि अश्रू धुराच्या नळकांड्या फोडल्या होत्या. त्यात दोन्ही बाजूंनी अनेक लोकं जखमी झाली आहेत.

दरम्यान, आतापर्यंत या आंदोलनापासून दूर असणाऱ्या काँग्रेसने अखेर मैदानात उडी घेतली आहे. काँग्रेस खासदारांसह राहुल गांधी, अध्यक्ष खरगे आणि प्रियांका गांधी वाड्रा या पंतप्रधानांच्या ७ लोक कल्याण मार्गाबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे. यात काँग्रेसचे अनेक खासदार आणि नेते उपस्थित आहेत. त्यावेळी पोलिसांनी बळाचा वापर करत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना बळजबरीने गाडीत घालून नेत आहे.

विशेष म्हणजे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानापासून जवळपास ७ किलोमीटर लांब चालत येत आंदोलनस्थळी पोहचले आहेत. काँग्रेसने धर्मेश प्रधान यांचा राजीनामा मागितलाच आहे त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल झालेल्या विद्यार्थ्यांविरूद्धच्या हिंसाचारावर माफी मागावी अशी देखील मागणी केली आहे.

राहुल गांधी यांनी दिल्लीत विद्यार्थांवर लाठीचार्ज केला त्यावर प्रतिक्रिया दिली. त्यावेळी राहुल गांधी यांनी, 'देशातील विद्यार्थी म्हणत आहेत की आमचे काही भविष्य नाही. या सरकारमधील मंत्री आमची खुर्ची जाणार नाही असं म्हणत आहेत. ज्या देशातील विद्यार्थी भविष्य गमावून बसत आहेत आणि मंत्र्याची साधी खुर्ची जात नाही तर हा न्याय असूच शकत नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT