Shama Mohamed Sarfaraz Khan selection X post:
काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या शमा मोहम्मद या त्यांच्या एका ट्विटमुळं वादाच्या भोवऱ्यात अडकल्या आहेत. त्यांनी भारताचा फलंदाज सर्फराज खान याला भारतीय संघातून का डच्चू मिळाला यााबबतचं एक ट्विट केल होतं. त्यांनी या ट्विटच्या आडून आधीचा भाजपचा खासदार आणि आता भारतीय संघाचा कोच असलेल्या गौतम गंभीरवर टीका केली. यानंतर भाजपचे नेते शमा मोहम्मद यांच्यावर तुटून पडले.
काँग्रेसच्या प्रवक्त्या शमा मोहम्मद यांनी, 'सर्फराज खानची संघात निवड न होण्यामागं त्याचं आडणाव आहे का? मी फक्त विचारच आहे. गौतम गंभीर यांचे बाबतीत काय मत आहे हे आम्हाला माहिती आहे.'
सर्फराज खान याला भारतीय अ संघातून वगळण्यात आलं आहे. त्यानंतर शमा मोहम्मद यांनी हे ट्विट केलं. भारतीय अ संघ बंगळुरूमध्ये दक्षिण अफ्रिका अ संघासोबत मालिका खेळणार आहे.
दरम्यान, शमा यांच्या या वादग्रस्त ट्विटनंतर त्यांच्यावर क्रिकेटला धार्मिक रंग देण्याचा आरोप होऊ लागला आहे. सर्फराज खान २०२४ मध्ये शेवटचा भारताकडून शेवटचा सामना खेळला होता. त्यानंतर त्याचा बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी विचार करण्यात आला नाही. तसंच इंग्लंड, वेस्ट इंडीज विरूद्ध देखील तो संघाबाहेरच होता. त्यानं देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करून देखील त्याला सतत डावललं जात आहे.
शमा महोम्मद यांच्यापूर्वी एमआयएमचे प्रवक्ते वारिस पाठण यांनी देखील सर्फराजला सतत डावलण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. त्यांनी एवढ्या चांगल्या सरासरीनं धावा करणाऱ्या खेळाडूला तुम्ही घेत का नाहीये असा प्रश्न त्यांनी विचारला होता.
दरम्यान, भाजपचे प्रवक्ते शहझाद पुनावाला यांनी काँग्रेस क्रिकेटला धार्मिक रंग देत आहे असा आरोप केला. त्यांनी ट्विट केलं की, 'ही महिला आणि त्यांचा पक्ष हा आजारी आहे. रोहित शर्माला जाड्या म्हणाल्यानंतर आता हा पक्ष आपल्या क्रिकेट संघाला धार्मिकतेच्या आधारावर विभाजित करू इच्छिते? देशाचं विभाजन करून यांचं मन भरलं नाही का? याच संघात मोहम्मद सिराज आणि खलील देखील खेळत आहेत. भारताला धार्म, जातीच्या आधारावर विभाजित करणं बंद करा.'