Company Fires Skipping Lunch Break pudhari
राष्ट्रीय

Company Fires Skipping Lunch Break: लंच स्किप करता अन् कार्यालयातून लवकर निघून जाता... कंपनीने पाठवलं काढून टाकल्याचं लेटर

Company Fires Skipping Lunch Break: ऑफिसमध्ये लंच ब्रेक न घेता डेस्कवरच जेवण करणे आणि काम संपवून सायंकाळी ६ ऐवजी ५ वाजताच घरी निघून जाणे एका महिला कर्मचाऱ्याला महागात पडले आहे.

Anirudha Sankpal

Company Fires Employee Skipping Lunch Break: ऑफिसमधील आपले काम वेळेवर पूर्ण करणे आणि लवकर घरी जाणे ही चुकीची गोष्ट आहे का अशी एक चर्चा सुरू झाली आहे. त्याचं झालं असं की एक कर्मचारी कथितरित्या लंच ब्रेक घेत नाही अन् आपलं काम करत करत डेस्कवरच जेवण करते. ती कर्मचारी सायंकाळी ६ ऐवजी ५ वाजताच ऑफिसमधून जाते. हे कारण देऊन कंपनीने त्या महिला कर्मचाऱ्याला काढून टाकलं आहे. याबाबतचे टर्मिनेशन लेटर सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

लंच ब्रेक न घेता एक तास आधी ऑफिस सोडते

सोशल मीडियावर कथित टर्मिनेशन ईमेल व्हायरल होत आहे. यात विषय त्वरित 'टर्मिनेशन - ऑफिस धोरणांचे उल्लंघन' असे लिहिले होते. ईमेलमध्ये सांगण्यात आलं की कर्मचारी नेहमी १ ते २ मधला लंच ब्रेक घेत नव्हती. ती आपल्या डेस्कवरच जेवण करत होती. ती जेवण करता करता काम देखील करत होती.

ईमेलमध्ये संबंधित महिला कर्मचारी सायंकाळी ६ वाजता ऑफिस बंद होण्याच्या आधीच एक तास म्हणजे ५ वाजता ऑफिसमधून बाहेर पडत होती. आता तिच्या या व्यवहारावर आक्षेप घेतला आहे. ईमेल पाठवणाऱ्या कंपनीचा दावा आहे की या सवयीचा प्रभाव इतर कर्मचाऱ्यांवर देखील पडू लागला होता. ते देखील अशाच प्रकारे काम करत होते.

कंपनीचा दावा काय?

कथित ईमेलमध्ये कंपनीने स्पष्ट केलं की लंच ब्रेकवेळी काम पूर्ण करणे आचा अर्थ असा नाही की कर्मचारी आपल्या मर्जीने ऑफिस लवकर सोडू शकतो. दिलेलं काम पूर्ण झाल्यानंतर देखील सर्व कर्मचाऱ्यांना ऑफिसने निश्चित केलेल्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. कंपनीने ईमेलमध्ये कडक शब्दात लिहिलं की ऑफिसचे नियम कंपनी निश्चित करते. कर्मचाऱ्यांनी त्याचे पालन करायचं असतं. त्यानंतर ईमेलमध्ये संबंधित महिला कर्मचाऱ्याला तत्काळ प्रभावाने नोकरी सोडण्यास सांगण्यात आलं आहे.

सोशल मीडियावर प्रतिक्रिया

हा ईमेल सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर अनेक नेटकऱ्यांनी वेगवेगळी प्रतिक्रिया दिली आहे. काही लोकांनी कंपनीच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. कर्मचाऱ्याला थेट नोकरीवरून काढून टाकण्याऐवजी इशारा देता आला असता. ऑफिस पॉलिसी समजून सांगता आली असती.

काही युजर्सनी कर्मचाऱ्याच्या वागण्याला देखील दोष दिला. त्यांनी ऑफिस जर सायंकाळी ६ वाजेपर्यंत आहे तर तुम्हाला ५ वाजता ऑफिस सोडण्याचा अधिकार नाही. तुम्ही जरी लंच ब्रेकमध्ये काम केलं असलं तरी हे योग्य नाही. काही युजर्सनी मूळ मुद्दा हा लंच ब्रेक न घेणे हा नसून आधी ऑफिस सोडण्याचा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT