CJP Instagram Account Blocked: कॉक्रोज जनता पार्टीचे अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर स्वातंत्र्य दिनालाच टाळं लागलं आहे. CJP फाऊंडर अभिजीत दिपके यांनी स्वतः याची माहिती दिली. त्यांनी आपल्या वैयक्तिक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून एक पोस्ट शेअर केली. त्यांनी पेज ब्लॉक करणाऱ्यांना 'डरपोक' देखील म्हंटल.
भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनाच्या सकाळी सीजेपी फाऊंडर अभिजीत दिपके यांनी एक्सवर पोस्ट केली. त्यात त्यांनी एक फोटो शेअर करून, कॉक्रोज जनता पार्टीचे अधिकृत इन्स्टाग्राम हँडल हटवलं आहे. किती घाबरलेले आहेत बघा असे कॅप्शन दिले.
यापूर्वी अभिजत दिपके यांनी स्वतंत्रता दिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यासाठी त्यांनी एका खास फोटोची निवड केली होती. त्यांनी नीट पेपर लीग आंदोलनावेळी दिल्लीतील जंतर मंतरवर विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जचा एका फोटो शेअर केला. या फोटोखाली त्यांनी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा... हा फोटो आपल्याला अजून खूप मोठा टप्पा गाठायचा आहे याची आठवण करून देणारा आहे असं सांगितलं.
सीजेपीच्या आवाहनावर देशातील हजारो तरूणांनी जंतर मंतरवर आंदोलन केलं होतं. आता या आंदोलनानंतर अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वाखाली सीजेपीची टीम ही देशभरात गावातील शाळा सुधारणा मोहीम हाती घेणार आहे. अभिजीत दिपके यांनी शुक्रवारी सांगितलं की सीजेपीकडून स्वतंत्रता दिवसाचे औचित्य साधून महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यातील त्यांच्या गावातून शाळा सुधारणा मोहीम सुरू होणार आहे. या मोहीमेचा उद्येश हा ग्रामीण भागातील सरकारी शाळांच्या पायाभूत व्यवस्थेत सुधारणा करणे आणि त्यासाठी जबाबादारी निश्चित करणे असणार आहे.