Cockroach Janata Party Reshuffle pudhari
राष्ट्रीय

Cockroach Janata Party Reshuffle: कॉकरोज जनता पार्टीत मोठे बदल; आशुतोष रांका अन् सौरव दासची जागा कोण घेणार?

Anirudha Sankpal

Cockroach Janata Party Reshuffle: कॉकरोज जनता पार्टीने आपल्या संघटनेचा विस्तार करण्याचा निर्णय गेतला आहे. त्यांनी दोन नवीन पदे तयारी केली असून राष्ट्रीय प्रवक्ता सौरभ दास आणि आशुतोष रांका यांचे खांदे पालट करण्यात आलं आहे. त्या दोघांना सह संयोजक ही नवी जबाबदारी देण्यात आली आहे. याचबरोबर मंगळवारी सकाळी कॉकरोज जनता पार्टीने आपल्या ६ नव्या संघटना महासचिवांची नावे देखील जाहीर केली. या महत्वाच्या पदावर रेशा शर्मा, अश्रय शिंदे, प्रेम आकाश, अनाम उज्जमा, बालकृष्ण शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सीजेपीने सुधीर सांगवान आणि सिद्धांत भारद्वाज यांना राष्ट्रीय प्रवक्ता घोषित केलं आहे. यापूर्वी ही पदे सौरव दास आणि आशुतोष रांका यांच्याकडे होती. आता या दोघांनाही राष्ट्रीय सह संयोजक करण्यात आल्याने प्रवक्तेपद रिकामं झालं होतं. सीजेपीने यापूर्वीच तीन प्रवक्ते पदांची घोषणा केली होती. तिसरा प्रवक्ता म्हणून विजेता दहिया यांचे नाव होते. मात्र २० जुलै रोजी बर्गर वादामुळं विजेता दहियाला पदावरून हटवण्यात आलं होतं.

नॉर्थ झोनच्या कमिटीचा विस्तार

कॉकरोज जनता पार्टीने नॉर्थ झोनसाठी समन्वयक समितीत अनेक सदस्यांची नियुक्ती केली आहे. या समितीत आदेश प्रधान गुर्जर, अजाद मोहित, मोहम्मद फरहान खान, विश्वेष कर्नवाल, उज्ज्वल पांडे, पूजा सैनी, आफताब सिंह विर्क, अर्शदीप सिंह, कोचर, जाहिद अहमद माले, महविश अली, श्रेष्ठ सिंह खेरा, अजय देशवाल, डॉ. विवेक सांगवान, मुकेश ऑलराऊंडर, राम जाखर, हर्ष कार्तिकय सिंह आणि एडवोकेट आरूषी घई यांचा समावेश आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT