Ashutosh Ranka Attacked pudhari
राष्ट्रीय

Ashutosh Ranka Attacked: CJP च्या आशुतोष यांच्या टीमला मारहाण; राजस्थानातील सरकारी शाळेची तपासणी करताना हाणामारी, गाडी फोडली

Anirudha Sankpal

CJP Leader Ashutosh Ranka Attacked: राजस्थानची राजधानी जयपूरच्या बगरू भागात रामपुरा कंवरपुरा गावातील एका सरकारी शाळेवरून जोरदार राडा झाला. कॉक्रोज जनता पार्टीने स्कूल ठीक करो ही मोहीम सुरू केली आहे. याअंतर्गत पक्षाचे कार्यकर्ते सरकारी शाळेत जाऊन शाळांच्या अवस्थेचे ऑडिट करत आहेत.

मात्र राजस्थानमध्ये या मोहिमेला हिंसक वळण लागलं. सीजेपी प्रवक्ता आशुतोष रांका यांनी सांगितलं की त्यांच्या टीममधील साथीदारांवर भाजप कार्यकर्त्यांनी हल्ला केला. त्यांची गाडी फोडली.

राजस्थानमध्ये मारहाण

सकाळी सकाळी जयपूरमधील रामपुरा आणि कंवरपुरा गावातील प्राथमिक शाळेत सीजेपी कार्यकर्ते तपासणी करण्यासाठी पोहचले. गावातील काही लोकांनी याचा विरोध केला. त्यानंतर सीजेपीचे कार्यकर्ते तिथून निघून गेले थोड्या वेळाने आशुतोष रांका स्वतः या शाळेत पोहचले. त्यानंतर काही लोकांनी त्यांच्याविरूद्ध घोषणाबाजी केली.

हळूहळू वातावरण तणावपूर्ण होऊ लागले. अचानक हाणामारी सुरू झाली. गावातील कार्यकर्त्यांनी सीजेपीच्या कार्यकर्त्यांविरूद्ध मारहाण केली. त्यांना गावातून पळून जाण्यास भाग पाडलं अन् गाडीच्या काचा देखील फोडल्या. काही ठिकाणी दगडफेक आणि माती देखील सीजेपीच्या कार्यकर्त्यांवर टाकण्यात आली.

अभिजीत दिपके काय म्हणाले?

अभिजीत दिपकेने सोशल मीडिया प्लॅटफॉर्वर एक पोस्ट करत या घटनेवर प्रतिक्रिया दिली. त्याने, 'आशुतोषवर भाजपच्या गुंडांनी राजस्थानमध्ये हल्ला केला. राजस्थान पोलिसांनी असं करू दिलं.

आशुतोष यांनी देखील दिली प्रतिक्रिया

आशुतोष यांनी ज्यावेळी त्यांच्या कार्यकर्त्यांना वाईट वागणूक देण्यात येत होती त्यावेळी सोशल मीडियावर आरोप केला की गावात गावकरी नाही तर भाजपचे गुंड आणले गेले होते. या गुंडाचा म्होरक्या कमल प्रधान गरीबांच्या जमिनीवर कब्जा करण्याचे काम करतो. रांकाने ज्यावेळी हा प्रकार घडला त्यावेळी तो तिथंच होता आणि त्यांच्यासोबत देखील भाजप कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा दावा केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT