Saurav Das Modeling Old Tweet: कॉकरोच जनता पार्टीचे सह संयोजक सौरभ दास हा कॉकरोच पार्टी या प्रेशर ग्रुपमध्ये सामील होण्यापूर्वी एक लीगल रिपोर्टर म्हणून काम करत होता. पत्रकार म्हणून काम केलेल्या सौरभ दास कधी काळी मॉडेल होण्याची स्वप्ने पाहत होता. ९ वर्षापूर्वीचे त्याचे एक ट्विट सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या ट्विटमध्ये तो ई-कॉमर्स कंपन्यांना संपर्क करून त्यांच्या प्रोडक्टसाठी मॉडेलिंग करण्याबाबत कसा संपर्क केला जाऊ शकतो याची माहिती घेत आहे. यावरून आता सौरभ दास हा ट्रोल देखील होत आहे.
सौरभ दासने २०१७ मध्ये वयाच्या १८ व्या वर्षी कामाच्या शोधात होता. सौरभ दासला वाटत होतं की तो मॉडेल म्हणून काम करू शकतो. त्यासाठी त्यांनी काही ई-कॉमर्स कंपन्यांशी संपर्क केला होता. सोशल मीडियावर सौरभच्या या जुन्या ट्विटचे स्क्रीनशॉट व्हायरल होत आहेत.
सीजेपी नेता दासने २२ मे २०१७ रोजी रात्री १० वाजून १२ मिनिटांनी ऑनलाईन ई-कॉमर्स साईट फ्लिपकार्ट आणि त्याच्या कस्टमर केअरला टॅग करून, मी तुमच्या प्रोडक्ट्ससाठी मॉडेल म्हणून काम करू शकतो. कृपया मला मदत करा, धन्यवाद असे ट्विट केले होते. त्याच रात्री स्नॅपडीलसह इतर कंपन्यांना देखील सौरभने मेसेज केले होते.
सौरभ दास याला यावरून ट्रोलिंग सुरू झालं आहे. मात्र सौरभ दासकडून रोजगाराचा शोध घेणे ही काही वाईट गोष्ट नाही. मॉडेलिंग हे काही खराब क्षेत्र नाही. सौरभ दास याच्या ९ वर्षापूर्वीच्या ट्विटवरून आता काही लोक विनोद करणे आणि त्याची टर उडवणे हे उद्योग सुरू करत आहेत. सौरभ दासने याबाबत अजून कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
सौरभ दास दीर्घ काळासाठी फ्रीलान्सिंग लीगल रिपोर्टिंग करत होता. त्याने प्रतिष्ठित मासिकांसाठी लेख लिहिले आहेत. तो सर्वोच्च न्यायालयातील आणि उच्च न्यायालयातील जज आणि त्यांच्या कार्यपद्धतीवर लिहित होता.
दरम्यान, त्याचा जुना मित्र अभिजीत दिपकेने सोशल मीडियावर कॉकरोच जनता पार्टी हे पेज तयार केलं अन् त्याचे तुफान फॉलोअर्स निर्माण झाले. त्यानंतर सौरभ दासच्या कारकिर्दीला देखील कलाटणी मिळाली. आता तो एक राजकीय दबाव गटाचा प्रमुख चेहरा म्हणून काम करत आहे. त्यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवरून केंद्र सरकारला घेरलं आहे.