Saurav Das 2 Crore Suit: कॉक्रोज जनता पार्टीचे प्रवक्ते सौरव दास यांनी दिल्ली उच्च न्यायालयात २ कोटींचा दावा दाखल केला आहे. हा दावा राजकीय भाष्य करणाऱ्या अभिजीत अय्यर मित्रा आणि काही माध्यम संस्थानवर केला आहे. त्यांनी सौरव दास यांच्या प्रायव्हसीचे उल्लंघन केल्याचा दावा करण्यात आला आहे. यांनी सौरव दास याच्या घराचा पत्ता आणि इतर वैयक्तिक माहिती सार्वजनिक केल्याचा दावा करण्यात आला आहे.
सौरव दास यांनी लीगल न्यूज पोर्टल, मीडिया प्लॅटफॉर्म आणि इतर पोर्टल आणि वर्तमानपत्रांशी निगडीत असलेल्या सोशल मीडिया अकाऊंटची नावे यात समाविष्ट केली आहेत. त्याने आरोप केला आहे की तो ग्रेटर कैलाश इथं २०२५ च्या सुरूवातीपासून भाड्याने रहात आहे.
या माध्यम प्लॅटफॉर्मच्या प्रतिनिधींनी या घराच्या आवारात घुसखोरी केली. घराच्या आतील गोष्टींचे रेकॉर्डिंग केले आणि ५ ऑगस्टला हे फुटेज एक्स अकाऊंटवर पोस्ट केले. या व्हिडिओला २.१ मिलियन व्ह्यूज आले असून तो व्हिडिओ पुन्हा १० ऑगस्ट रोजी पब्लिश केला.
दासने अभिजीत अय्यर मित्रावर त्याने माझ्या घराचे डिटेल्स न्यूज पोर्टलवरील कार्यक्रमात उघड केले. त्याचबरोबर शेजाऱ्यांची देखील ओळख सांगितली आणि या घराचे भाडे महिन्याला जवळपास ७ लाख रूपये असल्याची खोटी माहिती देखील पसरवली.
मित्रा यांनी याबाबतच अनेक पोस्ट केल्या आहेत ज्यात माझी वैयक्तिक माहिती उघड झाली आहे. या सूटमध्ये नुकसान भरपाईसोबतच या प्रतिवाद्यांना अशा प्रकारची माहिती पब्लिश किंवा प्रसारित करण्यापासून रोखणे आणि त्याबाबतचे व्हिडिओ हटवण्याची देखील मागणी करण्यात आली आहे.
सौरव दासला येत असलेल्या हिंसक धमक्यांच्या पार्श्वभूमीवर अशी वैयक्तिक माहिती उघड करणे आणि सातत्याने उघड करणे यामुळे हिंसक लोकांना त्याच्या घराचा पत्ता, त्याची आणि कौटुंबिक माहिती मिळते, त्यामुळं यांचा मानसिक छळ आणि शारीरिक हिंसा होण्याची शक्यता असते असा देखील दावा करण्यात आला आहे.
नियमानुसार एन्फोर्समेंट अँड पेनल्टी रेग्युलेट बाय डेटा प्रोटेक्शन बोर्ड (DPB) नुसार जर महत्वाचा डेटा ब्रीच झाला किंवा त्याचे संरक्षण झालं नाही तर अशा गुन्ह्यात मोठा आर्थिक दंड ठोठावला जाऊ शकतो.