CJI Surya Kant  Pudhari.
राष्ट्रीय

CJP Protest Delhi: दिल्‍ली पोलिसांनी वकिलांना घेतले ताब्यात; सरन्यायाधीशांनी दिले मुक्त करण्याचे निर्देश

कारवाईनंतर 'सुप्रीम कोर्ट बार असोसिएशन'ची सरन्यायाधीशांकडे हस्तक्षेपाची विनंती

पुढारी वृत्तसेवा

Supreme Court lawyers detained Delhi : 'कॉकरोच जनता पार्टी'ने (CJP) जंतरमंतर येथे पुकारलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील सर्वोच्च न्यायालयाच्या आवाराजवळ आज वकिलांनी निदर्शने केली. यामध्‍ये ज्येष्ठ आणि महिला वकिलांनी आपला सहभाग नोंदवला. पोलिसांनी त्‍यांना ताब्यात घेतले. या काळात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली होती. या कारवाईनंतर 'सुप्रीम कोर्ट बार असोसिएशन'ने (SCBA) भारताच्या सरन्यायाधीशांकडे (CJI) हस्तक्षेप करण्याची विनंती केली. 'लाइव्ह लॉ'च्या वृत्तानुसार, त्यानंतर सरन्यायाधीशांनी संबंधित अधिकाऱ्यांना ताब्यात घेतलेल्या वकिलांची सुटका करण्याचे निर्देश दिले आहेत.

SCBA अध्यक्षांनी केली 'एक्‍स' पोस्‍ट

SCBA चे अध्यक्ष प्रदीप राय यांनी सकाळी ११.३० च्या सुमारास 'X' पोस्टच्‍या माध्‍यमातून पोलिसांनी वकिलांना ताब्‍यात घेतल्‍याचा मुद्दा उपस्थित केला. सर्वोच्च न्यायालयाच्या वकिलांना त्यांच्या चेंबरमधून ताब्यात घेतल्याच्या वृत्ताचे वर्णन त्यांनी "अत्यंत चिंताजनक" असे केले. हा विषय तातडीने सरन्यायाधीशांच्या निदर्शनास आणून दिला जात आहे. वकिलांना मनमानी पद्धतीने ताब्यात घेणे आणि त्यांना धमकावणे खपवून घेतले जाणार नाही. मी वकिलांच्या त्वरित सुटकेची मागणी करतो," असेही राय यांनी पोस्‍टमध्‍ये नमूद केले. त्यांनी नवी दिल्लीचे पोलीस उपायुक्त (DCP) यांच्याशीही चर्चा केली आहे. उपायुक्तांनी त्यांना आश्वासन दिले की ताब्यात घेतलेल्या वकिलांची त्वरित सुटका केली जाईल.

ताब्‍यात घेतलेल्‍या वकिलांची सटका करण्‍याचे सरन्‍यायाधीशांचे निर्देश

'लाइव्ह लॉ'च्या वृत्तानुसार, त्यानंतर सरन्यायाधीशांनी संबंधित अधिकाऱ्यांना ताब्यात घेतलेल्या वकिलांची सुटका करण्याचे निर्देश दिले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT