नवी दिल्ली : भारताचे सरन्यायाधीश भुषण गवई यांना अलिकडेच हैदराबाद दौऱ्यात गंभीर संसर्ग झाल्याचे निदान झाले होते, त्यानंतर त्यांना दिल्लीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले. ते उपचारांना चांगला प्रतिसाद देत आहेत. एक-दोन दिवसात त्यांना रुग्णालयातून सुटी मिळेल होतील आणि पुन्हा ते कर्तव्यावर रुजू होतील, अशी माहीती अधिकृत सूत्राने दिली.
सरन्यायाधीश भुषण गवई १२ जुलै रोजी नालसर कायदा विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला संबोधित करण्यासाठी हैदराबादमध्ये होते. त्याच दिवशी त्यांनी हैदराबादमध्ये "डॉ. बाबासाहेब आंबेडकर- संविधान सभा- भारताचे संविधान" या शीर्षकाचे एक विशेष पोस्टल कव्हर आणि "भारताच्या संविधानातील कला आणि सुलेखन" या विषयावर चित्र पोस्टकार्डचा संच देखील प्रकाशित केला. या दौऱ्यात त्यांना संसर्ग झाला होता. याचे स्वरुप गंभीर असल्याने दिल्लीत परतल्यावर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.