CM Joseph Vijay plays chess with Praggnanandhaa viral: भारताचा स्टार बुद्धीबळपटू प्रज्ञानंदने आज तमिळ नाडूचे मुख्यमंत्री जोसेफ विजय यांची भेट घेतली. यावेळी राज्य सरकारकडून चेस चॅम्पियन प्रज्ञानंदचा ५० लाख रूपये रोख बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला. त्याने तमिळ नाडूचे नाव जागतिक पातळीवर उंचावल्याबद्दल हा गौरव करण्यात आला होता. यावेळी मुख्यमंत्री विजय यांना प्रज्ञानंदसोबत बुद्धीबळ खेळण्याचा मोह आवरला नाही. मात्र चॅम्पियन प्रज्ञानंदने या ६८ घरांचा मीच राजा आहे हे अवघ्या काही चालीत दाखवून दिलं.
मुख्यमंत्री जोसेफ विजय आणि प्रज्ञानंद यांच्यात एक फ्रेंडली बुद्धीबळाची मॅच झाली. यावेळी पांढऱ्या प्याद्यांसह खेळणाऱ्या विजय यांनी पहिली चाल खेळली. जसजसे सामना पुढे गेला. प्रज्ञानंदने पहिल्यांदा आपले दोन्ही घोडे मैदानात आघाडीवर ठेवले. विजय यांनी देखील आपला घोडा मैदानात उतरवलं. या घोड्यांच्या द्वद्वात आधी विजय यांचा घोडा मारला गेला.
त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी प्याद्यानं प्रज्ञानंदचा एक घोडा मारला. मात्र मुख्यंत्र्यांच्या या आनंदावर लगेचच प्रज्ञानंदने पाणी फेरलं. त्यानं थेट आपला वजीर बाहेर काढत मुख्यमंत्र्यांच्या राजाच्या जवळ तो नेला. मुख्यमंत्री विजय यांनी प्याद्यानं या वजीराला मात देण्याचा प्रयत्न केला. मात्र तिथंच ते फसले. पुढच्याच चालीत प्रज्ञानंदच्या वजीरानं थेट राजाला चेकमेट केलं.
भारताचा युवा बुद्धीबळपट्टू आर. प्रज्ञानानंद याने नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद होईल अशी कामगिरी करत प्रतिष्ठेचे नॉर्वे बुद्धिबळ विजेतेपद पटकावले. ओस्लो येथे शुक्रवारी झालेल्या अंतिम फेरीत जर्मनीच्या व्हिन्सेंट कीमर याच्यावर अंतिम फेरीत विजय मिळवत प्रज्ञानानंदने हा मान मिळवला. या स्पर्धेचे विजेतेपद जिंकणारा तो पहिलाच भारतीय खेळाडू ठरला आहे.
अंतिम फेरीपूर्वी 20 वर्षीय प्रज्ञानानंद 15 गुणांसह तिसऱ्या स्थानावर होता. मात्र निर्णायक क्षणी त्याने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत कीमरचा पराभव केला आणि तीन पूर्ण गुण मिळवत एकूण 18 गुणांसह विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले आणि भारतीय बुद्धिबळाच्या इतिहासात आणखी एक सुवर्णपान जोडले.