पुढारी ऑनलाईन डेस्क : केंद्र सरकाने यावर्षी देशभरात जातनिहाय जनगनणा करण्याचे ठरवले आहे. यापूर्वी १९३१ मध्ये ज्यावेळी देशावर इंग्रजांचे शासन होते त्यावेळी जातनिहाय जनगणना झाली होती. आता जवळपास १०० वर्षानंतर अशी जनगनणा होणार आहे. पण या सर्वामध्ये अनेक प्रश्न उभे राहत आहेत. की देशात असे अनेक लोक आहेत की जे जातच मानत नाहीत. आणि अशी लोकसंख्या कीती आहे. त्यांच्या या खानेसुमारीवर काय परिणाम होणार.
इंग्रजांच्या काळात Caste Census झाली होती. त्यावेळचे जनगणना आयुक्त जनरल जॉन हेनरी हटन यांचे म्हणने होते की या देशाला समजायचे असेल तर जातनिहाय जनगनणा होणे आवश्यक आहे. इंग्रजांच्या राजवटीला बळकटी आनण्यासाठी हटन यांचे प्रयत्न सुरु होते. या जनगनणेत अनुसुचित जाती, जनजाती, मागसवर्गीय जाती यासह त्यांच्या व्यवसायांचे पण सविस्तर नोंद झाली होती. त्यानंतर १० वर्षानंतर दुसऱ्यांदा अशी गनणा होणार होती पण त्यावेळी दुसरे महायुद्ध सुरु होते. त्यामुळे दुसरी जातनिहाय जनगणना झालीच नाही.
त्यांनंतर स्वतंत्र भारतात पहिल्यांदात अशी जातनिहाय जनगनणा करण्याचा मुद्या पुढे आला. त्यावेळी तत्कालिन सरकारने प्रत्येक वेळी याचा विरोध केला मतांचे राजकारण प्रत्येक वेळी अशा जनगणेत आडकाठी ठरत गेले.
वास्तविक २०११ मध्ये सरकारने जातीसंबधी जनगनणेसाठी काम सुरु केले होते. तेव्हा लाखो लोकांनी आपली जात सांगण्यास नकार दिला होता. त्यावेळी जी माहिती संकलीत केली जात होती त्यामध्ये जातीचा एक रकाना दिला होता.पण अनेक लोकांनी तो भरलाच नाही. त्यामुळे अपुरीच माहिती गोळा झाली होती. व जातनिहाय जनगनणा बारगळली होती.
गेल्या जनगणनेत जवळपास ४६ लाख कुटुंबानी आपली जात सांगण्यास नकार दिला होता. त्यामळे जात या रकान्यातील माहिती विनाउपयोगाची माहिती म्हणून सोडून दिली होती. त्यानंतर सरकारच्या लक्षात आले की एवढ्या मोठ्या लोकांची माहिती अशी सोडून देणे योग्य होणार नाही त्यामुळे विनाजात अशी कॅटॅगरी करण्यात आली होती.
सध्या स्वतःला कोणत्याच जातीचे न मानणारा मोठा वर्ग आहे अशा लोकांना कोणत्या कॅटेकगरीच घालायचे. तसेच धर्म न माननारेही अनेक लोक आहेत. त्यांचे काय करायचे असा प्रश्न सरकारसमोर उद्भवू शकतो. गेल्या जनगणनेत धर्म या कॉलम मध्ये others असा नावाचा एक ऑप्शन होता. यामध्ये No Religion असा पॉईंट होता. गेल्यावेळी २९ लाख लोकांनी आपला कोणताही धर्म नाही असे लिहले होते. काही हजारांनी तर नास्तिक असे लिहले होते. दरम्यान २०१२ मध्ये एक सर्वे केला गेला यामध्ये देशभरात ८१ टक्के लोक धर्म मानणारे, १३ टक्के कोणताही धर्म न मानणारे, ३ टक्के नास्तिक लोक असल्याची माहिती समोर आली होती.
जेव्हा जातनिहाय जनगणना होईल तेव्हा जातीचा कॉलम अनेकजन रिकामा सोडतील. त्यावेळी मग ती संबधित व्यक्ती किेंवा कुटुंब हे कोणत्या जातीच्या आरक्षणात येणार हा प्रश्न उभा राहिल. आणि यंदाच्या या जातनिहाय जनगनणेत लाखो लोकांनी आपली जातच सांगितली नाही तर आरक्षणाच्या नितीवर काय परिणाम होईल. याचा विचारही सरकारला करावा लागणार आहे. , ,