Election Commission Of India EVM Changes :
केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आज इव्हीएम बाबत एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून EVM वरील मतपत्रिकेत महत्वाची सुधारणा करण्यात येणार आहे. आता EVM मत पत्रिकेवर उमेदवारांचा रंगीत फोटो असणार आहे. उमेदवाराचा फोटो असलेल्या जागेत ७५ टक्के एवढा ठळक फोटो छापला जाणार आहे. हा बदल बिहार विधानसभा निवडणुकीपासून लागू होणार आहे. निवडणूक आयोगानं अनेक राजकीय पक्षांनी तक्रारी केल्यानंतर हा महत्वाचा बदल केला आहे. याचा उद्येश हा प्रक्रिया सुलभ हा आहे. मतदारांसाठी सोयी सुविधा वाढवण्यासाठी गेल्या ६ महिन्यात निवडणूक आयोगानं २८ उपक्रम घेतले होते. त्याच्याशी हा निर्णय सुसंगत आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगानं बुधवारी आपल्या डिझाईनिंगच्या गाईडलाईन्समध्ये बदल केला. आता ४९बी नियामाअंतर्गत इव्हीएम मतपत्रिकेच्या प्रिंटिंगमध्ये बदल करण्यात आला आहे. हा नियम १९६१ चा आहे. याचा उद्येश हा मतपत्रिका ही जास्त मतदार फ्रेंडली बनवणे हा आहे.
निवडणूक आयोगानं गेल्या सहा महिन्यात २८ अनेक उपक्रम हाती घेतले होते. इव्हीएम मतपत्रिकेवर फोटो हा देखील याचाच एक भाग आहे. याचबरोबर निवडणूक आयोगानं उमेदवारांचे सीरियल नंबर देखील डिस्प्ले करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर नोटाचा पर्याय देखील अधिक ठळकपणे देण्याचा निर्णय घेतला आहे. याचबरोबर आता मतदान पत्रिका ही ७० जीएसएम पेपरवर प्रिंट करण्याचा देखील निर्णय निवडणूक आयोगानं घेतला आहे. विधानसभेच्या निवडणुकीवेळी मतदान पत्रिका ही पिंक कलरमध्ये असणार आहे.
निवडणूक आयोगानं या बदलांबाबतचं ट्विट केलं आहे.