Prataprao Jadhav Pudhari
राष्ट्रीय

Prataprao Jadhav | मागील १० वर्षात अर्थसंकल्पात आयुषचा उल्लेख नव्हता: मात्र आज आनंदाचा दिवस : मंत्री प्रतापराव जाधव 

Union Budget 2026 | अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान सारख्या ३ संस्थांना मंजुरी

पुढारी वृत्तसेवा

3 new AIIA institutes Budget 2026

नवी दिल्ली : २०४७ च्या विकसित भारताची पायाभरणी म्हणून यंदाच्या अर्थसंकल्पाकडे पहिले जाईल. विशेष म्हणजे आयुष मंत्रालयासाठी आजचा दिवस आनंदाचा होता. मागील १० वर्षात अर्थसंकल्पात आयुषचा उल्लेख नव्हता. मात्र, निर्मला सीतारामन यांनी आमच्या मागणीची दखल घेत जवळपास ४ हजार कोटी पेक्षा अधिक रुपये देऊ केले आहेत, तसेच अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान सारख्या ३ संस्थांना मंजुरी दिली आहे, अशी प्रतिक्रिया केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी दिली. 

अर्थसंकल्पावर बोलताना मंत्री जाधव म्हणाले की, अर्थमंत्र्यांनी आयुषशी संबंधित अनेक गोष्टी अर्थसंकल्पात घेतल्या. एकूण भाषणात ५ मिनिटे अर्थमंत्री आयुषवर बोलल्या. ४ हजार ४०८ कोटी रुपये यंदा आयुषला देण्यात आले आहेत. आयुष विभागाची वाढ मोठ्या प्रमाणावर होत आहे.

जागतिक आरोग्य संघटनेचे एक केंद्र जामनगर इथे आहे. त्याला आधुनिक करण्याचा निर्णय झाला आहे. या महत्वाच्या गोष्टींसह २ हायस्पीड ट्रेन महाराष्ट्राला मिळाल्या आहेत. महाराष्ट्र हे देशातील एक प्रगत राज्य आहे, म्हणून केंद्राकडून विविध गोष्टी राज्याला मिळाल्या आहेत, असेही ते म्हणाले. 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT