Bride Viral Video  file photo
राष्ट्रीय

Viral Video : बंदूक घेऊन वधूची ‘दबंग’ एंट्री; हवेत गोळी झाडताच नवरदेवाचं डोकं फिरलं, पुढे काय झालं तुम्हीच पाहा?

Bride Viral Video : विवाहासाठी स्टेजवर येताना नववधूने थरारक एंट्री केली. लग्नाच्या स्टेजवर पोहोचताच तिने पिस्तूल काढून हवेत गोळीबार केला. पुढे नेमकं काय झालं पाहाच...!

मोहन कारंडे

Viral Video

उत्तर प्रदेश : विवाह हे नेहमीच एक पवित्र आणि भावनिक बंधन मानले गेले आहे, दोन व्यक्ती आयुष्यभर एकत्र राहण्याचं आणि एकमेकांना साथ देण्याचं वचन देतात. म्हणूनच लग्नसोहळ्याला मंगलकार्य म्हटले जाते. पण उत्तर प्रदेशमधल्या प्रतापगड जिल्ह्यात झालेल्या एका लग्नाने सगळ्यांचं डोकं फिरवलं! विवाहासाठी स्टेजवर येताना नववधूने थरारक एंट्री केली. लग्नाच्या स्टेजवर पोहोचताच तिने पिस्तूल काढून हवेत गोळीबार केला. वधूचा दबंग अवतार सगळेच पाहत राहिले. पुढे नेमकं काय झालं पाहाच...!

ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाली आहे आणि आता सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसते की, स्टेज अतिशय सुंदरपणे सजवण्यात आला होता. सर्वत्र रोषणाई आणि फुलांची सजावट होती. वर आधीच स्टेजवर आला होता. तो वधूची वाट पाहत असतो. तेवढ्यात लग्नाचे संगीत वाजते आणि वधू शाही थाटात प्रवेश करते. लाल रंगाच्या लेहंग्यात आणि दागिन्यांनी सजलेली वधू स्टेजकडे पुढे येते. तिची एंट्री सर्व पाहुणे पाहत होते.

पिस्तूल घेऊन वधू आली अन्...

ती जशी स्टेजच्या पायऱ्या चढते, तशी ती वराचा हात धरते आणि दुसऱ्या बाजूने एक पिस्तूल काढून हवेत गोळी झाडते. गोळीचा आवाज ऐकताच तेथे उपस्थित असलेले पाहुणे थक्क होतात. काही जण भीतीने मागे सरकतात, तर काही जण हे दृश्य आपल्या कॅमेऱ्यात कैद करू लागतात.

हा व्हिडिओ व्हायरल होताच सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पूर आला आहे. अनेकांनी वधूच्या या वागण्याला बेजबाबदार आणि धोकादायक म्हटले आहे. "ज्याला बंदूक चालवण्याची समज नाही, त्याला शस्त्र बाळगण्याचा हक्क मिळू नये" असे एकाने म्हटले आहे. तर दुसऱ्या एका वापरकर्त्याने प्रश्न उपस्थित करत कारवाईची मागणी केली आहे. "शस्त्र वधूपर्यंत पोहोचले कसे? यासाठी जबाबदार असलेल्या व्यक्तीवर कारवाई झाली पाहिजे," असे त्याने लिहिले आहे.

वधूचं वर्तन की 'स्टंटबाजी'?

व्हिडिओमध्ये वराची प्रतिक्रियाही चर्चेचा विषय बनली आहे. तो संपूर्ण घटनेमुळे घाबरलेला आणि आश्चर्यचकित दिसतो. काही सोशल मीडिया युझर्सनी तर या लग्नाची तुलना एखाद्या चित्रपटाच्या शूटिंगशी केली आहे. ‘रिअल लाईफ बायोपिक सीन’ असे म्हटले आहे. या व्हिडिओने अनेकांचे मनोरंजन केले असले तरी, लग्नासारख्या पवित्र कार्यात अशा प्रकारच्या स्टंटबाजी कशासाठी? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT