राष्ट्रीय

bribe case | 30 हजारांची लाच, घरातील झाडाझडतीत हाती लागलं 4 कोटीचं घबाड ; कपाटात, बॅगेत नोटांचे बंडल!

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची उपसंचालकांच्‍या कार्यालयासह घरावर धडक कारवाई

पुढारी वृत्तसेवा

bribe case 4 crore cash seized

भुवनेश्वर : ओडिशाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने भ्रष्टाचारविरोधी मोहिमेत आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली आहे. कटक मंडळाचे खाण उपसंचालक देबब्रत मोहंती याला ३० हजार रुपयांची लाच घेताना पकडल्यानंतर, त्याच्या घराच्या झडतीमध्ये तब्बल ४ कोटी रुपयांहून अधिक रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.

कोळसा विक्रेत्‍याकडून घेतली ३० हजारांची लाच

'एएनआय'ने दिलेल्‍या वृत्तानुसार, देबब्रत मोहंती यांनी एका परवानाधारक कोळसा विक्रेत्याकडे ३०,००० रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. त्‍याने यासंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. या तक्रारीची पृष्‍टी झाल्‍यानंतर मंगळवारी रात्री (दि. २४) काल रात्री सापळा रचून मोहंती यांना ही लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडले.

एकाच वेळी अनेक ठिकाणी छापेमारी

मोहंती यांच्या अटकेनंतर 'ओडिशा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांच्याशी संबंधित त्‍यांच्‍या कटक येथील शासकीय कार्यालय, भद्रक येथील त्यांचे वडिलोपार्जित घर, भुवनेश्वर येथील त्यांचा आलिशान फ्लॅटवर एकाचवेळी छापे टाकण्‍यात आले.

कपाटात आणि ट्रॉली बॅगमध्ये लपवल्या होत्या नोटा

लाचलुचपत प्रबिंधक विभागाच्‍या पथकाने मोहंती यांच्या भुवनेश्वरमधील निवासस्थानाची झडती घेतली. त्‍यावेळी सापडलेली रोकड पाहून अधिकारीही अवाक झाले. घरातील कपाटे आणि ट्रॉली बॅग्जमध्ये नोटांची बंडले ठासून भरलेली होती. आतापर्यंतच्या मोजणीत ४ कोटी रुपयांहून अधिक रोकड हस्तगत करण्यात आली आहे. पैशांचा आकडा इतका मोठा आहे की, त्याचे अचूक मूल्य निश्चित करण्यासाठी यंत्रांच्या सहाय्याने अजूनही मोजणी प्रक्रिया सुरू आहे.

ओडिशा राज्‍याच्‍या इतिहासातील 'सर्वात मोठी' जप्ती

ओडिशा लाचलुचपत प्रबिंधक विभागाच्‍या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विभागाच्या स्थापनेपासूनची ही एकाच कारवाईत झालेली सर्वात मोठी रोख जप्ती ठरली आहे. ३० हजार रुपयांच्या लाचेच्या प्रकरणातून सुरू झालेला हा तपास आता कोट्यवधींच्या बेहिशोबी मालमत्तेपर्यंत पोहोचला आहे. या कारवाईमुळे ओडिशामधील प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, मोहंती यांच्याकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसा कोठून आला, याचा पुढील तपास राज्‍य सरकार करत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT