राघव चढ्ढा यांना उपनेता पदावरून हटवल्यानंतर प्रियंका चोप्रांची साथ; सोशल मीडियावर रंगली चर्चा  file photo
राष्ट्रीय

राघव चढ्ढा यांना उपनेता पदावरून हटवल्यानंतर प्रियंका चोप्रांची साथ; सोशल मीडियावर रंगली चर्चा

पियंका चोप्राने जिजू राघव चढ्ढा यांना सोशल मीडियावर पाठिंबा व्यक्त करत लक्ष वेधून घेतलेय.

पुढारी वृत्तसेवा

bollywood priyanka chopra came in support of raghav chadha after aap party demotes him from deputy leader

पुढारी ऑनलाईन :

आम आदमी पक्षा (आप) च्या राज्यसभेतील उपनेते पदावरून खासदार राघव चढ्ढा यांना हटवण्यात आले आहे. त्यानंतर ते सतत चर्चेत आहेत. आता या प्रकरणावर ग्लोबल स्टार प्रियंका चोप्रा हिचीही प्रतिक्रिया समोर आली आहे.

अभिनेत्री परिणीती चोप्रा हिचे पती आणि खासदार राघव चड्ढा यांच्यावर कारवाई झाली आहे. आम आदमी पार्टीने त्यांना राज्यसभेतील उपनेता पदावरून हटवले आहे. त्यांच्या जागी आता अशोक मित्तल उपनेता असतील. तसेच, AAP ने राज्यसभा सचिवालयाला कळवले आहे की राघव चड्ढा यांना संसदेत बोलण्यासाठी वेळ देऊ नये.

राघव यांनी यावर प्रतिक्रिया देत त्यांच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला. त्या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले, "मला शांत करण्यात आले आहे, मी हरलो नाही. सामान्य माणसासाठी माझा संदेश." यानंतर ते सोशल मीडियावर पुन्हा चर्चेत आले. अनेकांनी AAP च्या या निर्णयानंतर राघव चड्ढा यांच्या समर्थनात आवाज उठवला आहे, कारण ते सदनात मध्यमवर्गीयांच्या हक्कांसाठी बोलत आले आहेत.

या प्रकरणावर प्रियंका चोप्रा पुन्हा चर्चेत आली आहे. मात्र यावेळी कारण चित्रपट नसून तिच्या जीजू राघव चड्ढा यांना दिलेला पाठिंबा आहे. राघव यांच्या या व्हिडिओवर प्रियंका चोप्राने टाळ्या आणि हृदयाच्या इमोजीद्वारे आपला पाठिंबा व्यक्त केला. तिची ही छोटीशी प्रतिक्रिया सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आणि लोकांचे लक्ष वेधून घेतले.

माहितीसाठी, राघव चड्ढा यांचा विवाह अभिनेत्री परिणीती चोप्रा हिच्याशी झाला आहे, ज्या प्रियंका चोप्रा हिची चुलत बहिण आहे. त्यामुळे प्रियंकाचा हा पाठिंबा केवळ सार्वजनिक नसून कौटुंबिक नात्याचेही प्रतीक आहे. आता हे प्रकरण केवळ राजकारणापुरते मर्यादित न राहता बॉलिवूड आणि सोशल मीडियातही चर्चेचा मोठा विषय ठरले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT