Ahmedabad Plane Crash black box Pudhari
राष्ट्रीय

Ahmedabad Plane Crash Update| अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स निकामी; डेटा मिळवण्यासाठी अमेरिकेच्या प्रयोगशाळेत पाठविणार?

Ahmedabad Plane Crash Update| केंद्र सरकारचा लवकरच घेणार निर्णय, ब्लॅक बॉक्स परदेशात पाठवायचे ठरल्यास एक पथकही सोबत जाणार

पुढारी वृत्तसेवा

Ahmedabad Plane Crash

अहमदाबाद : एअर इंडियाच्या AI-171 या बोईंग 787-8 ड्रीमलाईनर विमानाचा 12 जून रोजी अहमदाबादमधील मेघानीनगर भीषण अपघात झाला. लंडनच्या गॅटविक विमानतळाच्या दिशेने निघालेल्या या विमानात 242 प्रवासी होते. या दुर्घटनेत एकूण 274 मृत्यू झाले आहेत.

मात्र, अपघातात फक्त एकच प्रवासी बचावला. या दुर्घटनेनंतर आता तपासात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या 'ब्लॅक बॉक्स' बाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

ब्लॅक बॉक्सला झालेले नुकसान

अपघातानंतर 28 तासांनी ब्लॅक बॉक्स सापडला. सध्या यंत्रणेने प्राथमिक तपास सुरु केला असला तरी ब्लॅक बॉक्सला नुकसान झाल्यामुळे त्यातील डेटा बाहेर काढणे कठीण जात आहे.

त्यामुळे हा ब्लॅक बॉक्स अमेरिकेतील नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्ड (NTSB), वॉशिंग्टन DC येथे पाठवला जाऊ शकतो, अशी शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.

जर ब्लॅक बॉक्स परदेशात पाठवला गेला, तर भारतीय अधिकाऱ्यांची एक टीमही त्याच्यासोबत जाईल, जेणेकरून सर्व प्रोटोकॉलचे पालन सुनिश्चित करता येईल.

तपासात काय पाहिले जात आहे?

CVR मार्फत पायलट्समधील शेवटचे संभाषण, चेतावण्या, अलार्म्स आणि इतर ध्वनी तपासले जातील.

कॅप्टन सुमित सभरवाल आणि फर्स्ट ऑफिसर क्लाईव्ह कुंदर यांच्यातील संवाद, त्यांच्या प्रतिक्रिया आणि अलार्मला दिलेले प्रतिसाद यांची नोंद असण्याची शक्यता आहे.

FDR वापरून फ्लाइटचा सविस्तर प्रवास, वेग, उंची, तांत्रिक प्रतिक्रिया आणि इतर डेटा सादर केला जाईल.

काय आहे 'ब्लॅक बॉक्स'?

'ब्लॅक बॉक्स' हा प्रत्यक्षात दोन यंत्रांचा समूह असतो – कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डर (CVR) आणि फ्लाइट डेटा रेकॉर्डर (FDR).

CVR: पायलट्समधील संभाषण, कॉकपिटमधील इतर ध्वनी, एटीसीसोबतचे संवाद, तसेच यंत्रणांचे अलार्म्स इत्यादी 2 तासांपर्यंत रेकॉर्ड करतो (AI-171 विमान 2014 मध्ये तयार झाले असल्याने त्यात 25 तासांची क्षमता नसल्याचे सांगितले जात आहे).

FDR: उंची, वेग, दिशा, थ्रस्ट, विंग कंट्रोल, विमानाच्या हालचाली अशा हजारो तांत्रिक बाबींची माहिती रेकॉर्ड करतो.

अपघाताची वेळ आणि परिस्थिती

AI-171 फ्लाइटने 12 जून रोजी दुपारी 1.39 वाजता अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण केले.

उड्डाणानंतर अवघ्या 36 सेकंदांनी 'मेडे' (Mayday) कॉल एअर ट्रॅफिक कंट्रोलला मिळाला.

त्यानंतर काही सेकंदांतच विमानाचे रडारवरून संपर्क तुटला.

विमान 600 फूट उंची गाठण्याआधीच थांबले आणि थेट मेघानीनगरमधील BJ मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलवर कोसळले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT