प्रातिनिधिक छायाचित्र  (File Photo)
राष्ट्रीय

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची तिसरी यादी जाहीर

BJP Third Candidate List | Delhi Assembly Elections | मोहन सिंह बिष्ट यांना मुस्तफाबादमधून उमेदवारी

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा : दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी (Delhi Assembly Elections) भाजपने एका उमेदवारासह तिसरी यादी जाहीर केली. यामध्ये मोहन सिंह बिष्ट यांना मुस्तफाबादमधून उमेदवारी दिली आहे.

दिल्ली विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. आम आदमी पक्षाने आधीच आपले सर्वच्या सर्व उमेदवार जाहीर केले आहेत. भाजपने पहिल्या यादीत २९, दुसऱ्या २९ आणि तिसऱ्या यादीत १ असे एकूण ५९ उमेदवार आतापर्यंत जाहीर केले आहेत. ११ उमेदवार जाहीर करणे आणखी बाकी आहेत. (Delhi Assembly Elections)

... म्हणून उमेदवार जाहीर करण्यास उशीर?

भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत आणि पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी रात्री पार पडली. यानंतर रविवारपर्यंत दिल्ली विधानसभेसाठी भाजपच्या उर्वरित १२ उमेदवारांची यादी येणे अपेक्षित होते. मात्र सोमवारी आलेल्या तिसऱ्या यादीत केवळ एकमेव उमेदवार जाहीर करण्यात आला. उरलेल्या ११ जागांवर अनेक इच्छुकांपैकी एकाला संधी देताना इतरांची मनधरणी करणे आणि त्यातल्या त्यात निवडून येण्याची क्षमता असलेला उमेदवार शोधणे, यावर भाजप नेतृत्व विचार करत असल्याचे समजते. त्यामुळे उमेदवार जाहीर करायला उशीर होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT