BJP On Rahul Gandhi pudhari
राष्ट्रीय

BJP On Rahul Gandhi: तुम्ही कधी मोठे होणार... राहुल गांधींची ती मिठी भाजपला चांगलीच बोचली

Anirudha Sankpal

BJP On Rahul Gandhi: विरोधीपक्ष नेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी संसदेचे पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर पंतप्रधान आणि गृहमंत्री यांच्यावर टीका केली. तसेच सरकारच्या परराष्ट्र धोरणावर देखील व्यंगात्मक टीका केली होती. यावेळी त्यांनी काँग्रेस नेते संदीप दिक्षित यांना मिठी मारून सरकारचे परराष्ट्र धोरण हे फक्त जाऊन त्या देशांच्या नेत्यांना मिठी मारणे इतकेच असल्याचा दावा केला.

यावरून आता भाजपने राहुल गांधी यांच्यावर टीका केली असून केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी राहुल गांधी यांना तुम्ही कधी मोठे होणार असा सवाल केला. तुम्ही पंतप्रधानांवर टीका करताना भारताच्या लोकांचा अपमान करताय असं देखील जोशी म्हणाले.

प्रल्हाद जोशी म्हणाले की, 'राहुल गांधी तुम्ही कधी मोठे होणार? भारत चालवण्यासाठी एक मॅच्युअर लिडरशिपची गरज असते ना की एखाद्या अपरिपक्व नाटकी माणसाची. लोकांनी निवडून दिलेल्या सरकारला जोकर आणि कठपुतली म्हणणे यातून तुम्ही किती सजग आहात हे दाखवून देता.'

जोशी पुढे म्हणाले, 'पंतप्रधान हे निवडून आलेले नेते आहेत. राहुल गांधी आणि त्यांच्या कुटुंबीयांसारखे नाहीत. ते काही कौटुंबीक किंवा डायनेस्टिक पॉलिटिक्सद्वारे वर आलेले नाहीयेत. जे शब्दप्रयोग झाले आणि ज्या पातळीवर मान खाली घालावी लागली. त्यातून राहुल गांधी यांचा मूर्खपणा आणि नैराश्य दिसून येतं.' त्यांनी फक्त पंतप्रधानांचा अपमान केलेला नाही तर त्यांनी भारतातील नागरिकांचा देखील अपमान केला आहे.

राहुल गांधी यांनी संसदेचे पावसाळी अधिवेश संपल्यानंतर सरकारवर टीका केली. गृहमंत्र्यांनी २० जुलै रोजी विद्यार्थ्यांवर कोणी लाठीचार्ज आणि पॅलेट गनचा वापर करण्याचे आदेश दिले याचे उत्तर दिलेच नाही असे म्हणत आता पंतप्रधान आणि गृह मंत्र्यांना रात्री झोप लागणार नाही असा दावा केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT