BJP Ditch TMC Rebel MP pudhari
राष्ट्रीय

BJP Ditch TMC Rebel: भाजपनं हात केले वर... आता टीएमसी बंडखोरांना सोडलं वाऱ्यावर; आघाडी नाहीच

Anirudha Sankpal

BJP Ditch TMC Rebel: भाजपने पश्चिम बंगाल महानगरपालिका निवडणुकीत तृणमूल काँग्रेस बंडखोर खासदारांच्या पक्षासोबत युती करण्यास नकार दिला आहे. भाजपने पश्चिम बंगालमधील लोकल बॉडी इलेक्शनमध्ये एकला चलो रे चा नारा दिला आहे. त्यामुळं नॅशनलिस्ट सिटीझन पार्टी ऑफ इंडिया अर्थात टीएमसी बंडखोरांना स्वतंत्र लढावं लागणार आहे. एकप्रकारे भाजपनं बंडखोरांना वाऱ्यावर सोडलं आहे. मात्र असं असलं तरी दिल्लीत टीएमसीचे हे बंडखोर खासदार भाजपच्या नेतृत्वातील एनडीएचाच भाग राहणार आहेत.

भाजपला आता कोलकाता आणि हावडा निवडणुकीत एक महत्वाची चाचणी द्यायची आहे. त्यामुळं भाजप त्याची तयारी करत आहे. या वर्षी त्यांनी विधानसभा निवडणुकीत सहज विजय मिळवला होता. मात्र आता कोलकाता महानगरपालिका आणि हावडा महानगरपालिका निवडणुका या दुर्गा पूजा उत्सवानंतर होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत डीलिमिटेशनचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष समिक भट्टाचार्य यांनी नुकतेच सांगितलं की, 'पश्चिम बंगालमध्ये भाजपची कोणत्याही सहयोगी पक्षासोबत युती नाहीये. आम्ही कोलकाता आणि हावडा महानगरपालिका निवडणूक एकट्याने लडणार आहोत. आम्ही ती आमच्या स्वतःच्या ताकदीवर लढवणार आहोत.'

ते पुढे म्हणाले की, 'दिल्लीत NCPI सोबत आमची अंडरस्टँडिंग असेल मात्र कोलकाता दिल्लीपासून १५०० किलोमीटर दूर आहे. असं वक्तव्य करून भट्टाचार्य यांनी दिल्लीतील राजकारण आणि तिथल्या राजकीय भूमिका राज्यात जशाच्या तशा लागू होतील असं नाही याचे सुतोवाच दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT