नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा
दिल्लीतील तीन महानगरपालिकांच्या विलीनीकरणाबाबतचे विधेयक केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी शुक्रवारी लोकसभेत सादर केले. (Delhi civic bodies) आठवड्याच्या सुरुवातीला केंद्र सरकारने यासंदर्भातील प्रस्तावाला मंजुरी दिली होती. गृहमंत्री हे विधेयक लोकसभेत सादर करतील, अशी अपेक्षा होती; पण राज्यमंत्री राय हे विधेयक सादर केले.
दिल्ली महापालिका सुधारणा कायदा मंजूर झाल्यानंतर दिल्लीतील तीन महापालिका संपुष्टात येउन एकच महापालिका बनेल. त्यानंतर पूर्ण शहरासाठी एकच महापौर निवडला जाईल. सध्या दिल्लीत उत्तर, दक्षिण आणि पूर्व अशा तीन महापालिका कार्यरत आहेत. मार्च महिन्यात या महापालिकांसाठी निवडणुका जाहीर होणार होत्या. मात्र ज्या दिवशी निवडणुकांची तारीख घोषित केली जाणार होती, नेमके त्या दिवशी केंद्र सरकारने निवडणूक आयोगाला पत्र लिहित तारखा घोषित केल्या जाऊ नयेत, असे कळविले. तीन महापालिका भंग करून त्याऐवजी एकच महापालिका स्थापण्याचा विचार असल्याचे सांगण्यात आले होते. दरम्यान, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत वित्त विधेयक देखील सादर केले आहे..
हेही वाचलं का?