नाल्यातून अचानक वाहू लागल्या ५०० रुपयांच्या नोटा; पैसे उचलण्यासाठी लोकांची झुंबड, (video viral) file photo
राष्ट्रीय

नाल्यातून अचानक वाहू लागल्या ५०० रुपयांच्या नोटा; पैसे उचलण्यासाठी लोकांची झुंबड, (video viral)

या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे. व्हिडिओमध्ये लोक नोटा वाळवत असल्याचेही दिसत आहे.

पुढारी वृत्तसेवा

bikaner people found 500 notes in sewerage chamber video goes viral

बीकानेर : पुढारी ऑनलाईन

राजस्थानमधील बीकानेर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका सांडपाणी चेंबरमधून अचानक ५०० रुपयांच्या नोटा वाहू लागल्याने त्या गोळा करण्यासाठी लोकांमध्ये चढाओढ लागली. या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे. व्हिडिओमध्ये लोक नोटा वाळवत असल्याचेही दिसत आहे.

बीकानेरमध्ये सांडपाणी चेंबरमध्ये ५०० रुपयांच्या नोटा पडलेल्या आढळल्या. हे दृश्य पाहताच लोक हैराण झाले आणि नोटा उचलण्यासाठी गर्दी जमली. काही वेळातच चेंबरजवळ मोठी गर्दी झाली आणि लोक ५००-५०० रुपयांच्या नोटा गोळा करू लागले. याचा व्हिडिओही समोर आला आहे. व्हिडिओमध्ये लोक सांडपाण्यातून नोटा काढून त्या वाळवत असल्याचे, तसेच नोटा खऱ्या आहेत की बनावट याची तपासणी करत असल्याचे दिसते.

प्रत्यक्षात, बीकानेरमध्ये सांडपाणी चेंबरमध्ये ५०० रुपयांच्या नोटा सापडल्याने अनेकांनी त्या पाण्याने धुऊन वाळवल्या. काही लोकांनी तर स्वच्छ पाण्याने नोटा धुऊन त्या बनावट तर नाहीत ना, हे तपासण्याचा प्रयत्न केला. नोटा वाळवण्यासाठी काहींनी त्या दुचाकीवरही ठेवल्या.

या दरम्यान नोटा उचलण्यासाठी मोठी गर्दी जमा झाली. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीसही घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर पोलिसांनी लोकांना तेथून हटवले. लोकांना पांगवताना पोलिसांचा एक व्हिडिओही समोर आला आहे, ज्यामध्ये एक पोलीस कर्मचारी हातात लाठी घेऊन लोकांना पळवताना दिसतो.

पोलिसांकडून प्रकरणाची चौकशी सुरू

मिळालेल्या माहितीनुसार, नंतर पोलिसांनी या नोटा ताब्यात घेतल्या. नोटा खऱ्या आहेत की नाहीत, याची तपासणी पोलिस करत आहेत. तसेच या नोटा सांडपाणी चेंबरमध्ये कशा आल्या, याचाही तपास सुरू आहे. कायदेशीर कारवाईपासून वाचण्यासाठी कुणीतरी या नोटा सांडपाण्यात टाकल्या असाव्यात का, याचाही शोध पोलिस घेत आहेत. मात्र या सगळ्यात तेथे जमलेल्या अनेकांनी वाहत्‍या नाल्यातून नोटा काढून घेत तेथून पोबारा केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT