Bihar Shocker pudhari
राष्ट्रीय

Bihar Hospital Fire: आयसीयूमध्ये अग्नीतांडव... तब्बल १० रूग्णांचा जळून मृत्यू झाल्याची भीती

Anirudha Sankpal

Bihar Hospital Fire: बिहारमधील मुजफ्फरपूरमध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे. मुज्जफरपूरच्या प्रसाद हॉस्टिपटलच्या अतिदक्षता विभागात (ICU) आग लागली आहे. या आगीत अनेक रूग्ण जळून मृत झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. प्राथमिक माहितीनुसार १० लोकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. सध्याच्या घडीला तरी प्रशासनाने तीन मृत्यूची अधिकृत माहिती दिली आहे. ही घटना आज सकाळी ३ वाजण्याच्या सुमारास झाली आहे.

या घटनेबाबत सांगताना अधिकारी म्हणाले की, अग्नीशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळवलं आहे. सेन म्हणाले की, 'मुज्जफरपूरमधील प्रसाद रूग्णालयातील आयसीयुला आगलेल्या आगीमध्ये अनेकजणांचा मृत्यू झाला आहे. अग्नीशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवलं आहे. सध्याच्या घडीला अधिकृतरित्या तीन लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. सविस्तर माहिती काही वेळात मिळेल.'

सेन यांनी सांगितलं की आयसीयुमध्ये १५ रूग्ण दाखल होते. प्रशासनाला १३ जणांचे रेकॉर्ड सापडले आहेत. काही रूग्णांवर हे सीसीयुमध्ये उपचार सुरू होते. आता त्यांना जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

पीटीआयशी बोलताना सेन यांनी सांगितलं की, 'आम्ही त्यांच्या कुटुंबीयांचे जबाब नोंदवून घेत आहोत. आमच्याकडे येणारी प्रत्येक माहितीची आम्ही खातरजमा करून घेत आहोत. सध्याच्या घडीला तीन मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. आम्ही मृतदेह पाहिले आहेत. सिव्हिल सर्जन यांनी देखील ते कन्फर्म केलं आहे.'

सेन यांनी ही अत्यंत दुर्दैवी घटना असल्याचं म्हणत प्रशासनाचे प्राधान्य हे या घटनेची सोखल चौकशी करण्याकडे असेल असं देखील सांगितलं.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT