मुंबईः देशभरातील चर्चेत राहणाऱ्या निवडणूकीच्या दुसऱ्या टप्प्याचे मतदान पार पडले असून. विविध संस्थाचे एक्झिट पोल समोर आले आहेत. यामध्ये बिहार निवडणूकीसाठी 6 व 11 नोव्हेंबर अशा दोन टप्प्यात मतदान पार पडले होते. 14 नोव्हेंबर रोजी मतदारांनी कोणाला कौल दिला आहे हे स्पष्ट होईल. तत्पूर्वी आज आलेल्या एक्झीट पोलवरून NDA आघाडीला या कौल दिला आहे. निकालानंतर कोणाचा अंदाज खरा ठरेल हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
या निवडणूकीत एनडीए गठबंधनामध्ये भाजप. जनता दल यु. लोक जनतापक्ष रामविलास पासवान, यांचा समावेश आहेत. महाआघाडीमध्ये काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल, विकासशील पार्टी व डावी आघाडी यांचा समावेश आहे. या दोघांमध्येच आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या आहेत. तसेच प्रशांत किशोर यांची जन सुराज पार्टी पहिल्यांदाच निवडणूकीस सामोरी गेली आहे. आजच्या एक्झिट पोल मध्ये सर्व 243 जागांवरचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
एक्झिट पोल एनडीए महाआघाडी जन सुराज इतर
मॅट्रीझ 147-164 70-90 00- 02 02- 08
पिपल प्लस 122 - 159 75- 101 00- 05 02- 08
पिपल्स इलसाईट 133- 148 87-102 00- 03 05 -07
जेव्हिसी 135 - 150 88- 103 00- 01 03-06
चाणक्य 130- 138 100- 108 00- 00 03-05
पी मार्क 142- 162 80-98 01- 04 03- 05
या विविध संस्थानी केलेल्या एक्झिट पोल नुसार एनडीएला स्पष्ट बहुमत दिले आहे तर महाआघाडीला 100 च्या आत बाहेर जागा मिळती असा अंदात वर्तवण्यात आला आहे.