Bihar Begusarai shocking incident Pudhari
राष्ट्रीय

Shocking News : मानवतेला काळिमा! बलात्काराची तक्रार करणाऱ्या पीडितेलाच पंचायतीने लावली थुंकी चाटायला

बिहारमधील लाजीरवाणी घटना, व्‍हायरल व्‍हिडिओनंतर पंचायतीच्या तुघलकी फर्मानाने संतापाची लाट

पुढारी वृत्तसेवा

Bihar Begusarai shocking incident : बिहारमधील बेगुसराय येथे एका महिलेने तिच्यावर बलात्कार झाल्याची तक्रार दाखल केली. मात्र, तिला न्याय मिळण्याऐवजी पंचांकडून अमानुष शिक्षा देण्यात आली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून याप्रकारामुळे सर्वत्र तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

व्‍हायरल व्‍हिडिओमुळे संतापाची लाट

बिहारच्या बेगुसराय जिल्‍ह्यातील एका गावात पीडितेने बलात्काराची तक्रार केल्यानंतर संबंधित महिलेला पंचांसमोर अमानुष शिक्षा देण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोकांनी तीव्र संताप व्यक्त केला असून, पोलिसांनी या प्रकरणातील बलात्काराचा आरोप आणि सार्वजनिक अपमानाबाबत चौकशी सुरू केली आहे.

काय घडलं होतं?

२ जूनच्या रात्री शेजाऱ्याने महिलेच्या घरात जबरदस्तीने प्रवेश केला. तिला धमकी देऊन तिच्यावर बलात्कार केला.महिलेने असा आरोप केला आहे की, आरोपीने खिडकीतून पळून जाण्याचा प्रयत्न केला असता ग्रामस्थांनी त्याला पकडले. त्यानंतर पोलिसांना माहिती देण्याऐवजी गावकऱ्यांनी पंचायत बोलावली आणि पोलीस तक्रार न करता दोघांनाही सार्वजनिकरीत्या अपमानास्पद वागणूक दिली.

पंचायतीने थुंकी चाटायला भाग पाडले

१ ऑगस्ट रोजी दाखल करण्यात आलेल्‍या फिर्यादुनुसार, २ जूनच्या रात्री एका शेजाऱ्याने महिलेच्या घरात बळजबरीने प्रवेश केला आणि तिला धमकावून तिच्यावर बलात्कार केला. पीडितेने आरोप केला की, जेव्हा आरोपी खिडकीतून पळून जाण्याचा प्रयत्न करत होता, तेव्हा गावकऱ्यांनी त्याला पकडले आणि पोलिसांना माहिती देण्याऐवजी पंचायत थुंकी चाटायला भाग पाडण्यात आले. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने संताप व्यक्त केला जात असून, पोलिसांनी तिच्या आरोपांची आणि तिला सार्वजनिकरीत्या अपमानित केल्याप्रकरणी तपास सुरू केला आहे.

ग्रामस्‍थांचा वेगळाचा दावा मात्र अमानुष शिक्षेवर मौन

व्‍हायरल व्हिडिओची सुरुवात महिलेने कान धरून उभे राहण्याने होते. तिच्याभोवती ग्रामस्‍थ जमलेले दिसतात. त्यानंतर ती खाली वाकून जमिनीवरील थुंकी चाटताना दिसते.व्हिडिओच्या पुढील भागात एक पुरुष दिसतो, जो बलात्काराचा आरोपी असल्याचे मानले जाते; त्यालाही कान धरायला, माफी मागायला आणि जमावासमोर थुंकी चाटायला भाग पाडले जाते.३१ जुलै रोजी हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी ही तक्रार दाखल करण्यात आली.दरम्यान, गावातील स्थानिकांनी या प्रकरणावर वेगळा दावा केला आहे. महिला आणि आरोपी यांच्यात प्रेमसंबंध होते आणि त्यांना आक्षेपार्ह परिस्थितीत पकडण्यात आले होते, असा दावा ग्रामस्‍थांनी केला आहे. मात्र पीडितेला दिलेल्‍य अमानुष शिक्षेवर मौन बाळगले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT