Crime News: 'अपशकुनी' म्हणत टोमणे, सतत मानसिक छळ; नवविवाहित शिक्षिकेने जीवन संपवले, मृत्यूपूर्वी आईसाठी रेकॉर्ड केला व्हिडीओ

लग्नानंतर अवघ्या आठ महिन्यांत एका सरकारी शाळेतील नवविवाहित शिक्षिकेने जीवन संपवल्याची घटना उत्तराखंडमधील डेहराडून येथे घडली.
Dehradun crime news
Dehradun crime newsfile photo
Published on
Updated on

Dehradun crime news

डेहराडून : 'अपशकुनी' म्हणत सासरच्यांकडून होत असलेल्या मानसिक छळाला कंटाळून लग्नानंतर अवघ्या आठ महिन्यांत एका सरकारी शाळेतील नवविवाहित शिक्षिकेने जीवन संपवले. ही घटना उत्तराखंडमधील डेहराडून येथे घडली आहे. मृत्यूपूर्वी आईसाठी रेकॉर्ड केलेल्या भावनिक व्हिडीओमध्ये तिने सासरच्या लोकांकडून होत असलेल्या मानसिक छळाला कंटाळल्याचे सांगत, "हे लोक कधीच बदलणार नाहीत," असे म्हटले आहे.

सृष्टी कंधारी असे मृत शिक्षिकेचे नाव असून, या प्रकरणी पोलिसांनी पती, सासू आणि नणंद यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तिचा विवाह नोव्हेंबर २०२५ मध्ये सौरभ रतुरी याच्यासोबत झाला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत्यूपूर्वी काही वेळ आधी तिने आईसाठी एक व्हिडीओ रेकॉर्ड केला होता. त्यामध्ये लग्नानंतर गेल्या सहा महिन्यांपासून सातत्याने मानसिक छळ केला जात होता, असा आरोप तिने केला आहे.

Dehradun crime news
Crime News: जेवण वाढण्यास उशीर झाला, संतापलेल्या तरुणाने वहिनीचे कुऱ्हाडीने मुंडके तोडले अन् वडाच्या झाडाला टांगले

व्हिडीओमध्ये सृष्टी रडत म्हणते की, "आई, मला माफ कर. मी आता निघून चालले आहे. गेल्या सहा महिन्यांपासून मी हे सगळं सहन करत आहे. आता माझ्याकडून ते शक्य नाही. या लोकांची विचारसरणी कधीच बदलणार नाही. ते सतत मला टोमणे मारतात. लग्न झाल्यापासून माझ्याशी असंच वागलं जात आहे."

'अपशकुनी' ठरवत सातत्याने मानसिक छळ

सृष्टीची आई सीमा कंधारी यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत मुलीचा विवाहानंतर सतत मानसिक छळ करण्यात आल्याचा आरोप केला आहे. सासरच्या मंडळींकडून तिला वारंवार 'अपशकुनी' म्हणत घरातील प्रत्येक अडचणीसाठी जबाबदार धरले जात असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

तक्रारीनुसार, लग्नानंतर काही महिन्यांनी सृष्टीच्या सासऱ्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर एका पुजाऱ्याच्या सल्ल्यानुसार सासरच्यांनी सृष्टीला घरासाठी अपशकुनी मानण्यास सुरुवात केली आणि तिचा छळ अधिक वाढल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच, सासऱ्यांचे निधन झाल्यानंतर मानसिक छळ आणखी केला जात होता, असा दावा कुटुंबीयांनी केला आहे.

दोन दिवस संपर्क झाला नाही; रुग्णालयात दाखल केल्याचे सांगितले

२८ आणि २९ जुलै रोजी सृष्टीशी कुटुंबीयांचा संपर्क होऊ शकला नाही. त्यानंतर त्यांच्या ओळखीतील एका व्यक्तीने सृष्टीच्या घरी जाऊन चौकशी केली असता, ती आजारी पडल्याने रुग्णालयात दाखल केल्याचे सांगण्यात आले. मात्र, श्रीनगरहून देहराडूनला पोहोचेपर्यंत तिचा मृत्यू झाल्याचे नातेवाईकांना समजले. सृष्टीच्या कुटुंबीयांनी, तिच्या मृत्यूची माहिती सासरच्या मंडळींनी त्यांना दिलीच नाही. नंतर संपर्क साधला असता, "गोंधळामुळे कळवता आले नाही," असे कारण सांगण्यात आल्याचा आरोप केला आहे.

पती, सासू आणि नणंदेविरोधात गुन्हा

कुटुंबीयांच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी पती सौरभ रतुरी, सासू परवीना देवी आणि नणंद चारू यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी मृत्यूपूर्वीचा व्हिडीओ, शवविच्छेदन अहवाल, न्यायवैद्यक पुरावे आणि इतर कागदपत्रांची तपासणी सुरू केली असून, पुढील तपास सुरू आहे.

Dehradun crime news
Crime News: पोलीस दलाला हादरवणारी घटना! कॉन्स्टेबलकडून पोलिसाच्याच अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news